
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीत सध्या भन्नाट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. झिम्मा, झिम्मा 2 यांसारख्या दमदार सिनेमांनंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे फसक्लास दाभाडे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतोय. नुकताच या सिनेमाचा साँग लाँच सोहळा पार पडला. येलो येलो हे हळदीचं गाणं यावेळी रिलीज करण्यात आलं.