Robert Pattinson: ट्वायलाईट फेम अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सन झाला बाबा, पार्टनरने शेअर केला बाळाचा पहिला फोटो

Robert Pattinson: काही दिवसांपूर्वीच रॉबर्ट बाबा झाला. त्यांची होणारी पत्नी सुकी वॉटरहाऊसने (Suki Waterhouse) बाळाला जन्म दिला.
Robert Pattinson
Robert Pattinsonesakal

Robert Pattinson: ट्वायलाईट फेम हॉलिवूड अॅक्टर रॉबर्ट पॅटिन्सन (Robert Pattinson) आजही चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच रॉबर्ट बाबा झाला. त्यांची होणारी पत्नी सुकी वॉटरहाऊसने (Suki Waterhouse) बाळाला जन्म दिला. सोशल मीडियावर पहिल्यांदाच सुकीने बाळाची झलक शेअर केली. गायिका आणि अभिनेत्री असलेल्या सुकीने बाळाला हातात घेतलेलं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. पण अजून या दोघांनी बाळ मुलगा आहे कि मुलगी हे रिव्हील केलं नाहीये.

बाळाला हातात घेतलेली सुकी खूप सुंदर दिसत असून तिने फोटोला तितकंच छान कॅप्शन दिलं आहे. "welcome to the world angel " (या जगात तुझं स्वागत आहे देवदूता) असं तिने म्हंटल आहे. या पोलोराइड फोटोमध्ये सुकीने ग्रे रंगाचं स्वेटर घातलं असून केस सोडले आहेत तर बाळ तिच्या हातात असून तिने बाळाच्या डोक्यावर हात ठेवला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तीच आणि रॉबर्टचं अभिनंदन केलं.

Robert Pattinson
Drishyam Hollywood Remake : तमिळ, हिंदी नंतर आता हॉलीवूडमध्ये होणार अजयच्या 'दृष्यम'चा रिमेक! मेकर्सनं दिली गुड न्यूज

मार्चमध्ये सुकी आणि रॉबर्ट बाळाला घेऊन लॉस एंजेलिसमध्ये फिरत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते दोघेही पालक झाल्याच्या बातमीला यामुळे पुष्टी मिळाली. रॉबर्टने यावेळी ग्रे रंगाचा हुडी घातला होता आणि त्याच्या हातात बाबागाडी होती तर सुकी त्याच्या बाजूने चालत होती.

२०१८ मध्ये सुकी आणि रॉबर्टने डेट करायला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, ही जोडी त्यांच्या वैयक्तिक गोष्टी फार उघड करत नाही. ते दोघेही साधेपणाने राहणं पसंत करतात. काही काळापूर्वीच त्यांनी साखरपुडा केल्याची चर्चा होती.

या आधीही रॉबर्ट्स त्याच्या रिलेशनशिप्समुळे चर्चेत आला आहे. ट्वायलाईट सिनेमातील सहकलाकार क्रिस्टिन स्टुअर्टला तो आधी डेट करत होता तिच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर तो बराच काळ एफकेए ट्विग्स या ब्रिटिश गायिकेसोबत रिलेशनमध्ये होता पण २०१७ मध्ये त्यांनी त्यांचं नातं संपवल्याचं जाहीर केलं होतं.

Robert Pattinson
Hollywood Movie News : हॉलीवूडमध्येही महिला दिग्दर्शकांचे प्रमाण का होतयं कमी? 100 सर्वोत्तम चित्रपटांमध्ये फक्त...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com