अभिनेता सुनील शेट्टी याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याने सुपरहिट चित्रपट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो मुंबईत वास्तव्य करतो. त्यामुळे त्याला मुंबईबद्दल आणि मराठी भाषेबद्दल असलेलं प्रेम पुन्हा दिसून आलय. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो मराठी भाषेचं महत्त्व पटवून देतोय.