Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : जेठालाल घेतो एका एपिसोडसाठी 'इतकं' मानधन तर भिडेला आहे 'एव्हढा' पगार !

Jethalal and Bhide's salary for per episode : 'तारक मेहता का उलटा चष्मा' या शो तील स्टार कलाकार जेठालाल आणि भिडे किती मानधन घेतात हे जाणून घेऊया.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah ChashmahEsakal

Taarak Mehta : आता 'तारक मेहता का उलटा चष्मा' मुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते दिलीप जोशी हे एकेकाळी बॉलिवूडमध्ये छोटे रोल्स करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी तारक मेहता हा शो करण्यापूर्वी त्यांनी अनेक सहाय्यक भूमिका केल्या.

२००८ साली सुरु झालेल्या या शोने दिलीप यांचं आयुष्य बदललं आणि आता ते टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील आघाडीचे कलाकार आहेत. भारतीय टेलिव्हिजनवरील सध्या अतिशय गाजलेल्या पात्रांपैकी जेठालाल हे एक पात्र आहे आणि या भूमिकेमुळेच दिलीप हिंदी टेलिव्हिजनवरील महागड्या कलाकारांपैकी एक आहेत.

दिलीप घेतात इतकं मानधन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप अंदाजे एका एपिसोडसाठी दीड लाख रुपये मानधन घेतात. पण हा नुसता अंदाज असून निश्चित रक्कम कुणालाच माहित नाहीये. पण हे यश मिळवण्यासाठी दिलीप यांना आधी बराच स्ट्रगल करावा लागला आहे. दिलीप यांनी काम केलेल्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये त्यांना १०० रुपयांपेक्षा कमी मानधन मिळालं होतं असं म्हंटलं जात.

पण फक्त दिलीपचं नाही तर तारक मेहतामध्ये भिडेची भूमिका साकारणारे कलाकार मंदार चांदवडकरही महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. मंदार एका एपिसोडमागे ८०००० रुपये फी घेत असल्याचं म्हंटलं जातंय.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Tarak Mehta: मला आत्महत्या करावीशी वाटत होती... तारक मेहता मधील बावरीचा पुन्हा खळबळजनक खुलासा

दिलीप यांची कारकीर्द

१९८९ मध्ये दिलीप यांनी अभिनयक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. 'मैंने प्यार किया' हा त्यांचा पहिला सिनेमा. या सिनेमात त्यांनी रामू ही भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी 'हम आपके है कौन?' या सिनेमात काम केलं होतं. यानंतर त्यांनी 'फिर भी दिल है हिंदुस्थानी','खिलाडी ४२०','हमराज','दिल है तुम्हारा' सारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर 'दाल में काला','कोरा कागज','रिश्ते-द लव्ह स्टोरी','हम सब बाराती' या मालिकांमध्येही काम केलं असून या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या छोट्या छोट्या भूमिका सगळ्यांच्या लक्षात राहिल्या पण 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेने त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांची आणि तारक मेहताची जोडी सगळ्यांना आवडते.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Tarak Mehta Fame Dilip Joshi : तारक मेहताच्या जेठालालनं दीड महिन्यात घटवलं १६ किलो वजन! काय केलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com