URMILA NIMBALKAR VIRAL VIDEO
esakal
URMILA NIMBALKAR FACES ONLINE ABUSE OVER SAREE STYLE: अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर उर्मिला निंबाळकर ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करत असते. फॅशन, आयुष्य आणि गरजेला लागणाऱ्या गोष्टी, यावर नेहमीच ती योग्य माहिती देत असते. तिने काही दिवसापूर्वी 'पुरुषांवर बोलू काही' हा लाइव्ह शो सुरु केलाय. या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना पहायला मिळतोय. दरम्यान याच शोमध्ये उर्मिलाने नेसलेल्या साडीवरून तिला ट्रोल करण्यात आलंय. वेगळ्या पद्धतीने साडी नेसली म्हणून तिला, गँगरेप, जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लोकांच्या मानसिकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.