Mohena Kumari Singh: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई; गोंडस मुलीला दिला जन्म

Mohena Kumari Singh: मोहिना कुमारी सिंग (Mohena Kumari Singh) ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. मोहिनानं गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई
Mohena Kumari Singhesakal

Mohena Kumari Singh: छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मोहिना कुमारी सिंग (Mohena Kumari Singh) ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. मोहिनानं गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

मोहिनानं 2019 मध्ये सुयश रावतशी लग्न केले. मोहिना आणि सुयश यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. मोहिनानं तिच्या मुलाचं नाव अयांश असं ठेवलं आहे. आता मोहिनानं मुलीला जन्म दिला आहे.

मोहिनाचं घरी झालं जोरदार स्वागत

मोहिना कुमारी सिंगच्या फॅन पेजवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ती केक कट करताना दिसत आहे. मोहिना आणि तिच्या बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, कुटुंबीयांनी त्यांचे घरी जोरदार स्वागत केले, असे म्हटले जात आहे.

मोहिना कुमारी सिंगच्या फॅन पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये मोहिनाचा पती सुयश देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मोहिनाचा मुलगा अयांश देखील केक कट करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

मोहिनाने लग्नानंतर मनोरंजनसृष्टीला रामराम ठोकला. मोहिना ही उत्तर डान्सर देखील आहे. कोरिओग्राफर रेमो डिसूझासोबतही तिनं काम केले आहे. पण मोहिनी सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे.

मोहिनाने 'या' मालिकांमध्ये केलं काम

मोहिनाने 'नया अकबर बिरबल', 'कुबूल है', 'सिलसिला प्यार का' आणि 'प्यार तूने क्या किया' अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. तिनं 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत 'कीर्ती गोएंका सिंघानिया' ही भूमिका साकारली. या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.

सोशल मीडियावर असते अॅक्टिव

मोहिना ही सोशल मीडियावर तिचे विविध लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिला इन्स्टाग्रामवर 1.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिनीची GOOD NEWS

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com