

Ken Betwa Protest 2026: Daudhan Dam, Panna Tiger Reserve and the River Linking Debate
E sakal
Why the Ken Betwa Protest Matters: India's First River Interlinking Project Explained
एकीकडे दिल्लीचा Gen Z India CJP protest देशभरात गाजतोय आणि जेन झीच्या अनोख्या स्टाइलची चर्चा होतेय.
पण सध्या देशात आणखी एक महत्त्वाचं आंदोलन सुरू आहे. तिथल्या आंदोलकांनीही आपल्या अनोख्या पद्धतीमुळे देशाचं लक्ष वेधून घेतलंय. एका धरणाला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांनी चक्क नदीतच प्रतिकात्मक चिता बांधल्यात, कुणी प्रतिकात्मक फाशी घेत आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, न्याय द्या नाहीतर मग जीव तरी घ्या.
इथेसुद्धा अमित भटनागर या सामाजिक कार्यकर्त्याने आमरण उपोषणाची लढाई सुरू केली होती. पण हे आंदोलन विशेष चर्चेत आहे याला कारण आहे, ते देशातल्या पहिल्यावहिल्या नदीजोड प्रकल्पाशी संबंधित आहे.
पण हे आंदोलन नेमकं का केलं जातंय, ते करणारी लोकं कोण आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत? सगळं जाणून घेऊ सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.