Premium|Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीन योजनेवरून सरकारची तिजोरी ढनढन, वऱ्हाडी बोलीतून ‘लाडक्या वैनी’ची खनखन गप्पा

Ladki Bahin Yojana and Marathi Satire : लाडकी बहीण योजनेपासून जंतरमंतर आंदोलन, जेन झी आणि चहाच्या सवयीपर्यंतच्या गमतीदार संवादातून ग्रामीण बोलीतील विनोद, टोमणे आणि दैनंदिन जगण्याचं भन्नाट चित्र उभं राहतं.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

esakal

Updated on

किशोर बळी - sakal.avtaran@gmail.com

त्या लाडक्या बहीन योजनेचा काय भरोसा हाये हो वैनी? मतं भेट्यासाठी एक ॲटम काढला होता तो सरकारनं. आता तुमच्या लाडक्या बयनीच्यानंच तं सरकारी तिजोरी ढनढन हून राह्यली वैनी...

‘‘काय भाऊजी, तुम्ही तं जसे गायबच झाले. दोन मयने झाले पत्ता नाई तुमचा. ‘जंतर मंतर’च्या आंदोलनात गेलते काय?’’

‘‘मी काय ‘जेन झी’ हाव काय स्वीटी वैनी?’’

‘‘मी नसन गेली भाऊजी आंदोलनात; पन मी ‘जेन झी’च हाव म्हनलं भाऊजी. म्हना कशी?’’

‘‘हो ना वैनी, तुमचं वय तं काही पंधरा वर्सापासून अठराच्या वर जाऊनच नाई राह्यलं.’’

‘‘काल माही चुलत ननद तं मले म्हने, की तुमची पोरगी अन् तुम्ही बहिनी-बहिनीच दिसता म्हने.’’

‘‘जराशी तारीफ आमच्या रमश्यालेबी करू देत जा ना वैनी... की सबन कामं तुम्हीच करता?’’

‘त्याईले कुठी टाइम हाये माही तारीफ कराले? अन् तुम्हीबी फक्त चेंढायन्या करत राह्यता माह्यावाल्या.’’

‘‘बरं मी काय म्हनतो, कुठी गेले रमेसभाऊ?’’

‘‘ते दयन आन्याले गेले चक्कीवर. बसा, मी चहा मांडतो तुमच्यासाठी. म्हना काऊन?’’

‘‘काऊन?’’

‘‘तुम्हाले एक जोरदार गानं आइका लागन माह्यावालं.’’

‘‘नाई नाई... राहू द्या वैनी. मले अर्जंट आकोल्याले जा लागते.’’

‘माल्या गान्याची का ॲलर्जी हाये का पिंटूभाऊजी तुम्हाले?’’

‘‘नाई नाई, गान्याले नाई हो वैनी, म्या चहाले नाई म्हतलं. चहा सोळला म्या महाशिवरात्रीपासून. म्हनजे कालच डिसीजन घेतलं.’’

‘असं असं... म्हनजे चहा नाई चालत; पन मालं गानं तं आवळते

ना तुम्हाले?’

‘‘अंऽऽऽ ते आपलं हे... म्हनजे गानं तं आवळतेच म्हना. पन असं करा ना वैनी... यू-ट्युबवर टाका ना आम्ही पाह्यतोच मंग अन् व्हायरलबी करतो अवघ्या टुनकीत!!’’

‘‘पन मांगल्ल्या वक्ती तं तुम्ही अवघ्या दोस्ताईनं निऱ्हा धळाल डिसलाइक मारला होता माल्या गान्याचा व्हिडिओ.’’

‘‘नाई नाई... म्या लाइक केलता वैनी. तीन लाइक आले, त्यात तुम्ही दोघं अन् मी एक.’’

‘‘ते जाऊ द्या. तुम्ही लाइव्ह आइका मालं गानं. घटकाभर

तं बसा.’’

‘‘मी तुमचा लय मोठा फॕन हाव बरं वैनी. पन तुम्ही असं कुठीबी गानं नोका म्हनत जाऊ. व्हॕल्यू कमी होते त्यानं. आपून तुमचा ज्यलवा कारेक्रम घेऊ ग्रामपंचायतीत.’’

‘‘काही नाही भाऊजी. होईच्या दिवशी माला कार्यक्रम ठेवता अन् दोन गाने झाले की सबन दोस्त ‘झिंगाट’वर नाचता. मले सबन समजते बरं भाऊजी.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com