Premium|Pakistan Boycott Explain : बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना...! पाकिस्तानने ओढावून घेतलंय संकट

Pakistan Boycott Explain—हा वाद पाकिस्तानचा नव्हताच, पण तरीही त्यांनी स्वतःहून उडी घेत संकट ओढावून घेतले. बांगलादेशचा गोलंदाज मुस्ताफिजूर रहमानला आयपीएलमधून रिलीज केल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवला. त्यानंतर पाकिस्तानने यात उडी मारली अन् त्यांच्यावर डोक्यावर पडण्याची वेळ आली.
Pakistan boycott explained IND vs PAK

Pakistan boycott explained IND vs PAK

ESAKAL

Updated on

Pakistan boycott explained IND vs PAK : मुस्ताफिजूर रहमान याच्यापासून सुरू झालेला वाद, पाकिस्तानच्या भारतीय संघाविरुद्धच्या लढतीवर येऊन संपला... बांगलादेशचा गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान याच्या इंडियन प्रीमिअर लीगमधून हकालपट्टीवरून बांगलादेश क्रिकेट बोर्डाला ( BCB) राग येणे साहजिक होते... बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अन्यायाविरोधात भारतात तीव्र भावना उमटल्या आणि बीसीसीआयने सावध पवित्रा घेत कोलकाता नाइट रायडर्सना बांगलादेशी गोलंदाजाला रिलीज करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तुम्ही असं कसं करू शकता.. आमचा स्वाभिमान दुखावला गेलाय.. असा आवेश आणला आणि भारतात न खेळण्याचा हट्ट धरला...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com