Business Tricks : व्यापार करत असताना फटका का बसतो? उत्तम व्यापरासाठी करा या गोष्टी

माझा व्यवसाय नक्की कोणता व काय आहे? हा प्रश्न आपण स्वतःला वेळोवेळी विचारला आणि त्याचे उत्तर शोधले, तर आपला व्यवसाय खूप मोठा होऊ शकतो.
business tricks
business tricks esakal

सेक्शन : उद्योजकता


चकोर गांधी
chakorgandhi@gmail.com



माझा व्यवसाय नक्की कोणता व काय आहे? हा प्रश्न आपण स्वतःला वेळोवेळी विचारला आणि त्याचे उत्तर शोधले, तर आपला व्यवसाय खूप मोठा होऊ शकतो.

हा प्रश्न खरे तर सोपा आहे; त्यावर सखोल विचार केला, तर आपल्याला योग्य ती दिशा सापडू शकते. तसेच काही मोठ्या चुका आपण टाळू शकतो.


तुमचा व्यवसाय नक्की काय आहे, हा प्रश्न साधारणपणे विचारला, की उद्योजक किंवा व्यापारी अगदी सहज उत्तर देतात. त्या उत्तरामध्ये, ‘धंदा काय आहे’, याचा विचार नसतो, तर ‘आम्ही काय करतो’ याचे उत्तर असते.

वर्षानुवर्षे, दररोज तेच ते काम केले जाते; परंतु या रोजच्या कामाच्या पुढे जाऊन, सखोल विचार करून या प्रश्नाचे उत्तर काढून त्याप्रमाणे व्यवसाय केला, तर त्यात खूप मोठे यश मिळू शकते.

एका बँकेने शोधलेले उत्तर

एका बँकेने या एकाच प्रश्नावर तीन दिवस सखोल विचार करून व चर्चा करून एक उत्तर शोधले.

आता बँक म्हटल्यानंतर, साधारणपणे कोणीही म्हणेल, की तिचा व्यवसाय ठेवी घेणे व कर्ज देणे हा आहे; परंतु या प्रश्नावर विचार केल्यानंतर बॅंकेला जाणवले, की आपला व्यवसाय ग्राहकांसाठी समृद्धी निर्माण करणे, हाही आहे.

या उत्तराप्रमाणे वर्तन केल्यावर बॅंकेच्या व्यवसायाची व्याप्ती खूप वाढली. ‘ग्राहकाला आपण अनेक सेवा देऊ शकतो.

त्यापैकी कोणतीही गोष्ट करताना, ती या उत्तरामध्ये बसते का याची पडताळणी केली, तर यश मिळते,’ हेही बॅंकेला कळून चुकले.

आपण नक्की काय करतो?

खाद्यपदार्थ बनवणारा एखादा व्यावसायिक, ‘आम्ही अमुक पदार्थ बनवतो’, असे उत्तर देतो. त्यापुढे जाऊन वरील प्रश्नाचा विचार केला, तर खरे तर त्याचा व्यवसाय हा ग्राहकाला आनंद व समाधान देणारा असतो. हे म्हटल्यानंतर, हे उत्तर खूप व्यापक ठरते.

एखाद्या आर्किटेक्टला विचारले, तर तो ‘आम्ही घरांचे डिझाइन करतो’, असे उत्तर देईल. खरे तर तो ग्राहकाला अनेक वर्षे समाधान व सुखसोयी पुरवत असतो.

गुंतवणूक सल्लागाराला विचारले, तर तो ग्राहकांना केवळ जास्त परतावा देण्याच्याही पुढे जाऊन, कमाई वाढवून देण्याबाबत त्यांच्या मनात विश्वास निर्माण करीत असतो.

रेस्टॉरंट हे ग्राहकाला फक्त पोटभर अन्न योग्य किमतीत देण्याच्या पलीकडे जाऊन त्याला एक छानसा अनुभव देते, तृप्तीची भावना देते.

एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटचा व्यवसाय ‘ऑडिट’चा असतोच, पण त्यापुढेही जाऊन योग्य सल्ला व मार्गदर्शन देण्याचा असतो. डॉक्टरचा व्यवसाय फक्त आजाराचे निदान करणे व औषध देणे हा नसून, रुग्णाला आराम मिळवून देणे, त्याचा त्रास कमी करणे व त्याची प्रकृती निरोगी कशी राहील, हे पाहण्याचा असतो.

एखाद्या सर्जनची प्रॅक्टिस ही केवळ ऑपरेशन करणे, एवढीच नसून, रुग्णाच्या शरीरातील आजार घालवून त्याला बरे करणे अशा स्वरुपाची असते.


किरकोळ दुकानदार हा सहसा, ‘मी अमुक वस्तू ग्राहकाला विकतो’, असे उत्तर देतो; परंतु त्याने अधिक विचार केला, तर त्याच्या धंद्यात खूप मोठा बदल होऊ शकतो.

‘मी ग्राहकाला त्याच्या मनातल्या इच्छेप्रमाणे गोष्टी देतो’, असेही त्याचे उत्तर असू शकते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. बिल्डरचा धंदा हा केवळ फ्लॅट विकणे नसतो, तर तो ग्राहकाच्या आयुष्यातील स्वप्न पुरे करण्याचा असतो.

business tricks
Konkan Business : सतत कारणे देणाऱ्याचा उद्योग वाढत नसतो!

फटका का बसतो?
एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीने स्वतःलाच लागणार, म्हणून एक पंचतारांकीत हॉटेल काढले. नंतर या कंपनीच्या लक्षात आले, की हा आपला धंदा नाही. कंपनीने ते हॉटेल बंद केले. धातूचे पार्ट बनवणारी एक कंपनी हळूहळू धातूमध्ये व्यापार करू लागली.

त्यात नुकसान झाले आणि मग ही कंपनी तोट्यात गेली. खाद्यतेल बनविणारी एक कंपनी या तेलाच्या कच्चा मालाचा सट्टा करू लागली. त्यामध्ये ती कंपनी पूर्ण बुडाली.

अनेक वेळा असे दिसते, की एखादा व्यावसायिक खूप मोठा व दीर्घकालीन उधारीवर माल विकण्याचा धंदा करतो. त्याला वाटते, की आपण वस्तूंचा व्यापार करतो, पण खरे तर तो उधारीचा धंदा, म्हणजे पैसे पुरवण्याचा धंदा करीत असतो.

आपला धंदा नेमका काय आहे, याचे उत्तर शोधून, त्याची व्याप्ती वाढवून, त्याची दिशा मिळवून आपण चांगले यश मिळवू शकतो. जो धंदा आपला नाही, तो टाळून, मूळ धंद्याशी इमान राखून खूप मोठे नुकसान टाळू शकतो. थोडक्यात, एका छोट्या प्रश्नामध्ये धंद्याचे यश लपलेले आहे.

_______

business tricks
Konkan Business : सगळी सोंगं घेता येतात; पण पैशाचं सोंग घेता येत नाही.!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com