पुण्यात Dating Scam: पहिलीच भेट, पब आणि हजारोंचं बिल! तरुण ठरताहेत टार्गेट

First visit, pub and bill of thousands! Young people are the target | मी तिला जवळच्या चांगल्या हॉटेलचे अनेक पर्याय दिले पण ती काही तिकडे यायला तयार होईना.. तिने बाणेरमधील एका क्लबचं नाव सुचवलं...
Dating app scam
Dating app scamesakal

पुणे : “मला कधीच असं वाटलेलं नव्हतं की मलाही असल्या प्रसंगांना तोंड द्यावं लागेल.. एका डेटिंग अँप वरून आमची ओळख झाली. ती मुलगी अस्खलित इंग्रजीत बोलणारी.. राजस्थानची. इथे शिकायला आलेली.

मलाही फार हिंदी येत नसल्याने तिच्या सोबत इंग्रजीत बोलताना मलाही कम्फर्टेबल वाटत होते. पहिल्याच भेटीत आम्ही बाणेर येथील एका पबमध्ये गेलो. बिल आले, त्यावरचा आकडा बघून मी हादरलोच...

दमदाटी, वाद यानंतर मी जाळ्यात फसलोय हे लक्षात आलं पण पर्याय नव्हता. शेवटी मी बिल भरून बाहेर निघालो”…..सोशल मीडियावर एका तरुणाने शेअर केलेली ही पोस्ट. Dating App चा वापर करून तरुणांना गंडा घालणाऱ्या या स्कॅमचे लोण आता पुण्यापर्यंत पोहोचले आहे.

हा फक्त त्या मुलीपुरता स्कॅम नाही तर यामध्ये हॉटेल मालक, हॉटेल कर्मचारी, डेटिंग ऍप अशा सगळ्यांचा समावेश आहे. याविषयी अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत गुगलच्या रिव्ह्यूमध्ये आणि सोशल मीडियावर सविस्तर लिहिले आहे.

comment on social platform
comment on social platform esakal

दुसऱ्या एका तरुणाला देखील असाच अनुभव आला. डेटिंग अँप वरून ओळख झाल्यानंतर बाणेर येथील सोमेश्वर वाडी मंदिरात त्या मुलीला भेटायचं ठरलं. त्याने तिला दुसरे पर्याय दिले होते भेटायला पण ती म्हणाली, मी सोमेश्वर मंदिराजवळ राहत असल्याने मला तिथेच जवळ पडेल आपण त्याच क्लबमध्ये जाऊया.

तो मुलगा पुढे लिहितो की, जेव्हा आमचं फोनवर बोलणं होत होतं तेव्हा ती खूप अस्खलित इंग्रजीत बोलत होती... पण जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा तिला इंग्रजी धड बोलता येत नव्हतं, तसेच तिचा आवाजही वेगळा येत होता. मला ही पहिली धोक्याची घंटा वाटली.

तिला आता कुठेतरी पबमध्ये जायचं होतं. त्यासाठी मी तिला जवळच्या चांगल्या हॉटेलचे अनेक पर्याय दिले पण ती काही तिकडे यायला तयार होईना.. तिने बाणेरमधील एका क्लबचं नाव सुचवलं. तिला तिथेच जायचं होतं. तो क्लब सोडून ती कुठेही दुसरीकडे यायला तयारच होईना. मला ही दुसरी धोक्याची वाटली.

comment on social media
comment on social mediaesakal

तरीही मी त्या क्लबमध्ये गेलो. संध्याकाळच्या पाच वाजता तिथे असणारे अंधुक वातावरण मला आवडले नाही. हॉटेलमध्ये बऱ्याच ठिकाणी एकटे एकटे लोकं टेबलवर बसले होते.. एकत्रित लोकं बसलेले नसल्याने मला आणखीनच शंका आली.

मी तिला म्हटलं मला ही जागा नाही आवडली.. पण ती दुसरीकडे यायला अजिबातच तयार नव्हती... मी तिथे न थांबण्याचा निर्णय घेतला आणि तेथून निघून आलो... मी जेव्हा तिथून बाहेर पडलो आणि त्या क्लबचे रिव्ह्यू वाचले तेव्हा एका मोठ्या स्कॅम पासून वाचल्याचे मला समाधान वाटले.

याबाबत फसवणूक झालेल्या एका मुलाने लिहिले की, दोन तीन प्रकारच्या डेटिंग अँप वरून या मुली मुलांना या क्लबमध्ये यायला सांगतात.

एका मुलीने मलाही तिथे नेले. तिने सांगितले मी फक्त वोडका पिते. तिने अत्यंत महागड्या ऑर्डर दिल्या. वेटरपासून हॉटेलच्या मालकापर्यंत सगळे घोटाळ्यात सहभागी होते हे मला नंतर लक्षात आले.

वोडकाच्या नावावर त्या मुलीला ते फक्त पाणी देतात. तुमच्या ग्लासमध्ये मात्र वोडका असतो. मध्येच ती मुलगी स्वतःसाठी हुक्का ऑर्डर करते. जेवण, मद्यपान आणि हुक्का असं साधारण दोघांचं बिल हे चाळीस ते पन्नास हजार येते.

केवळ हुक्क्याचे बिल हे १० हजाराच्या जवळपास जाते. जेव्हा बिल देण्याची वेळ येईल तेव्हा ते मुलगी हळूच निघून जाते आणि नंतर ती मोबाईल नंबर स्वीच ऑफ येतो. इथे बिल न देता पैसे भरण्याचा आग्रह केला जातो.

तुही क्यूआर कोड स्कॅन करून जरी बिल पे केलं तरीही ते हॉटेलच्या नावावर नसेल तर तो एका महिलेच्या नावावर असते. बिलाबाबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला तर बाउंसरकडून दमदाटी केली जाते. आपली फसवणूक झाली आहे ही गोष्ट समजते पण जोपर्यन्त हे कळते तोवर आपली बदनामी होऊ नये म्हणून अनेक मुले येथून गुपचूप बिल भरून जातात.

अजून एका व्यक्तीने गुगल रिव्ह्यूमध्ये लिहिले आहे की, या हॉटेलमध्ये माझ्याकडून रेड वाईनच्या बाटलीसाठी १४९९९, मध्यम शिशासाठी (हुक्क्याचा फ्लेवर) ५९९९ तर केकसाठी २९९९ असे २७ हजार रुपये घेण्यात आले.

तर आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, गुगलवर देखील फेक कमेंट करत चुकीचे रिव्ह्यू देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात ही जागा अत्यंत महागडी आहे आणि खाण्याचा दर्जा देखील अत्यंत वाईट आहे. त्यामुळे इथे जाऊ नका.

अशा प्रकारचे स्कॅम या पूर्वी दिल्लीतील हॉटेलमध्ये यापूर्वी होत मात्र पुण्यातील आयटीचे क्राउड लक्षात घेऊन ज्या ठिकाणी आयटीमधील मुलं मुली राहतात अशा ठिकाणी असले प्रकार गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

यात काही हॉटेलसची चेन असण्याची शक्यता असून साधारण १८ ते ३० वयोगटातील मुलामुलींना टार्गेट केलं जात आहे. तसेच स्वतःच्या प्रतिमेखातर ही मुले या अशा प्रकारची कुठेही तक्रार देखील करताना दिसत नाही.

त्यामुळेच सोमेश्वरवाडी, बाणेर परिसरातील अशा हॉटेल्सवर कारवाई होणे गरजेचे असल्याचा सूर समाजमाध्यमांवर आळवण्यात येत आहे.

आज व्हेलेंटाईन डे! त्यामुळे तुम्ही तर अशा कुठल्या डेटिंगला जात नाही ना? आणि जाणार असालच तर जिथे आणि ज्यांच्यासोबत जाणार आहेत ते सुरक्षित आहे ना हे तपासून पाहायला विसरू नका. नाहीतर व्हेलेंटाईन डे च्या दिवशी तुमचे बँक अकाउंट रिकामे व्हायला वेळ लागणार नाही.

Dating app scam
AI Dating Tools : परफेक्ट लाईफ पार्टनर शोधण्यासाठी पठ्ठ्याने ChatGPT ला लावलं कामाला; 5,000 मुलींशी चॅट करून घेतला निर्णय!

अशा स्कॅमपासून सावध राहण्यासाठी काय कराल?

१) शक्यतो अनोळखी लोकांसोबत अनोळखी ठिकाणी जाणे टाळाच

२) जाणार असाल तर संबंधित व्यक्तीला लगेच तुमची सर्व खरी माहिती सांगू नका

३) बँक अकाउंटशी लिंक असणारा नंबर अनोळखी व्यक्तीला देणे टाळा.

४) ज्या ठिकाणी जाणार आहात त्याची आधी व्यवस्थित माहिती घ्या, त्याचे रिव्ह्यू वाचा, मित्रांशी चर्चा करा

५) अनोळखी व्यक्तीच्या वागण्याचा सातत्याने अंदाज घ्या, कुठेही धोक्याची घंटा वाटली तर पुढे जाणे टाळाच

६) कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर आधी तेथील चार्जेसचा अंदाज घ्या आणि मगच ऑर्डर द्या..

७) डेटिंग अँप आणि तत्सम गोष्टींवर माहिती देत असताना मेल आयडी तसेच नंबर स्वतंत्रच ठेवा.

८) तुम्ही कुठे जात आहेत याची माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तीला देऊन ठेवा.

(Know how to avoid such scams)

-----------------

Dating app scam
Romance Scam : भारतात वाढतोय 'रोमान्स स्कॅम', ऑनलाईन डेटिंगच्या नादात लाखो लोकांना लागतोय चुना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com