Shares

Shares

Esakal

Premium|Investment: शेअर्समध्ये गुंतवून १ कोटीचे ११ कोटी करावे की घर घ्यावं..? सीए सांगतांयेत गुंतवणुकीविषयी..!

Equity Shares: गुंतवणुकीचे गणित; घरामध्ये गुंतवणूक करावी की शेअर्समध्ये?
Published on

पुणे –

विशाल - काका हे घ्या पेढे. अहो घर घेतलं मी.

काका - काय सांगतोस.. वा वा. अरे पण तुमचा आधीचा फ्लॅट आहे नं.. तो विकला का मग..?

विशाल - नाही अहो. तो देखील आहे.

काका - अरे पण तू तर एकुलता एक. दोन घरं हवीयेत कशाला..?

विशाल - अहो काका.. इन्वेस्टमेंट म्हणून..

विशालच काय, पण तुम्ही आम्ही सुद्धा विशालप्रमाणेच विचार करणारी मंडळी..! हक्काचे घर असतानाही पुन्हा एकदा गुंतवणूक म्हणून घराचाच विचार करणारी. पण तुम्हाला जर पैसा वाढवायचा असेल तर पारंपरिक पद्धतीने चालत आलेली ही गुंतवणूक खरोखरच योग्य आहे का हे आपण तपासून पाहिले का..? या व्यक्तीरिक्त इक्विटी शेअर्समध्ये जर गुंतवणूक केली तर फायदा होईल की तोटा..? घरामध्ये म्हणजेच एका अर्थाने रिअल इस्टेटमध्ये केली जाणारी गुंतवणूक ही ट्रॅप तर ठरत नाही ना..? अशा अनेक प्रश्नांवर मार्केटचे गणित काय सांगतंय ते पाहूया. तसेच अर्थ क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या याबद्दल काय म्हणणं आहे हे आपण या सकाळ+ मधील विशेष लेखातून जाणून घेऊया.

चार्टर्ड अकाउंटंट असणारे नितिन कौशिक यांनी नुकतीच एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणतायेत की, "तुम्ही कोणाला असं म्हणताना ऐकलंय का, की प्रॉपर्टी खरेदी करा तुम्हाला कोटींमध्ये पैसे मिळतील. चला पाहूया काय असतं खरंच..?

 समजा तुम्ही आज १ कोटी रुपयांचा एक फ्लॅट खरेदी केला. या फ्लॅटची किंमत पुढील २० वर्षांत दरवर्षी ६% दराने वाढली, तर २० वर्षांनंतर याची किंमत अंदाजे ३ कोटी २० लाख रूपये होईल.

ऐकायला भारी वाटतंय, पण.. यातून वर्षाकाठी मिळणाऱ्या भाड्याचा विचार केला तर ते साधारण ३.५% ते ५% टक्के असेल. या शिवाय त्याचा मेंटेनन्स, स्टॅम्प ड्यूटी आणि इतर कर यावर तुमचा सतत खर्च होत राहणार आहे. तसेच तुमचे पैसे  हे अडकून पडणार आहेत. जर तुम्हाला उद्या तातडीने पैशांची गरज पडली, तर तो फ्लॅट एका दिवसात विकणे शक्य होईलच असे नाही.

त्याउलट

जर हेच १ कोटी रूपये तुम्ही इक्विटी (Equity / Stock Market) मध्ये गुंतवले तर आता याच १ कोटी रुपयांची तुलना Equity मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास काय होते, ते पाहू. जर तुम्ही १ कोटी रुपये २० वर्षांसाठी १२% चक्रवाढ दराने (Compounded Annual Growth Rate - CAGR) गुंतवले, तर २० वर्षांनंतर ही रक्कम अंदाजे ११ कोटी होईल.

याचे फायदे असे की, इक्विटीतून मिळणारा परतावा प्रॉपर्टीपेक्षा तीन पटींनी अधिक आहे. Liquidity म्हणजेच उद्या तुम्हाला अचानक पैसे लागले तर ते कधीही तुम्हाला सहज काढणे शक्य होणार आहे."

Shares
Premium| Investment Mindset : गुंतवणूकदार म्हणून ‘योग्य मानसिकता’ कशी बनवाल?

घर हा मुद्दा लोकांच्या कायमच भावनेशी जोडलेला आहे. घर घेणे ही गोष्ट त्यांना सुरक्षितेची भावना देते. विशाल सारखे अनेक लोक स्वत:चे हक्काचे घर असूनही ते पुन्हा घरामध्येच गुंतवणूक करतात.

तीन घरे असणारे श्रीकांत म्हणाले, घरांमधील गुंतवणूक मला त्यावेळी सुरक्षित वाटली म्हणून मी ती केली. मात्र ती प्रॉपर्टी सांभाळणे, भाडेकरूंच्या सततच्या तक्रारी, मेंटेनन्स, त्यातून महाराष्ट्रात काही ठिकाणी एकापेक्षा जास्त घर असलेल्या घरांवर ४० ट्क्के कर लावण्यात आला आहे. त्यामुळेच ही गुंतवणूक आता नकोशी वाटते आहे. केवळ सुरक्षित गुंतवणूक म्हणून मी याकडे पाहिले होते.

कायमच आपली गुंतवणूक शेअर्समध्ये करणारा प्रशांत शेळके म्हणाला. मला शेअर्समधील गुंतवणूकीतून नक्कीच चांगला फायदा झाला आहे. मला घरही घ्यायचे होते पण त्यावेळी मी शेअरमध्ये पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला. अगदी १२ टक्क्याने नाही पण मला चांगली वाढ या गुंतवणुकीतून मिळाली. पण तरीही मला ही सतत डोक्यावर टांगती तलवार देखील वाटते. सतत मार्केट खाली गेले तर, क्रश झाले तर अशी भितीदेखील वाटत राहते. अनेकदा बाजार खाली गेला मला लॉस देखील झाला पण तो सरासरीने भरून निघाला. पण शाश्वत काही वाटत नाही हे देखील तितकंच खरं.

प्रत्येक परिस्थितीत या गोष्टी वेगळ्या असतात. म्हणजे तुमच्याकडे सर्व बेसिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा आहे. तुमची आर्थिक स्थिती स्थिर आहे अशा वेळी शेअरमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते. किंवा सर्वच्या सर्व रक्कम त्यात न गुंतवता त्याचे प्रमाण ठरवणे गरजेचे आहे. तसेच घरामधील गुंतवणुकीच्या बाबतही आहे. तुमचा प्राधान्यक्रम अधिक सुरक्षित गुंतवणूक आहे की जोखीम स्विकारायची तयारी आहे यानुसार निर्णय घ्यावा.

स्नेहा कोळेकर, चार्टर्ड अकाउंटंट

Shares
Premium | Types of SIP: योग्य एसआयपी निवडली नाही तर होवू शकतं नुकसान! गुंतवणूकी आगोदर या ५ प्रकारच्या एसआयपींचे स्वरूप आणि फायदे-तोटे जाणून घ्या...

 गुंतवणूक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे मोठ्या अचानक येणाऱ्या आजारपणासाठी काही रक्कम लिक्विड फॉर्ममध्ये असणे आवश्यक आहे. तसेच तुमचा जर मालमत्तेत पैसे गुंतवण्याचा आग्रह असेल घराऐवजी कमर्शिअल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करा.  

स्नेहा शेवटी म्हणाल्या, शेवटी तुमच्या गुंतवणूकीत वैविध्य असणे गरजेचे आहे. १०० टक्के गुंवतवणूक ही एका क्षेत्रात असता कामा नये. त्यामुळेच तुमच्याकडे ‘१ कोटी सुद्धा आहेत’ किंवा ‘१ कोटीच आहेत’ या दोन वाक्यांवर गुंतवणुकीत फरक ठरू शकतो.

--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com