Premium|Cockroach Janata Party : जनतेच्या असंतोषाला नवी राजकीय दिशा मिळणार की सोशल मीडियापुरताच गाजावाजा?

Youth Political Movement : महागाई, परीक्षा घोटाळे आणि युवकांतील असंतोषाच्या पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने सामाजिक माध्यमांवर मोठी लोकप्रियता मिळवली असून तिच्या राजकीय प्रभावाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Cockroach Janata Party

Cockroach Janata Party

esakal

Updated on

भारतीय राजकारणात १३ ते १४ वर्षांपूर्वी एक वादळ निर्माण झाले होते. देशभरात समोर येत असलेले अनेक गैरव्यवहार, त्यात अडकलेले बडे राजकीय नेते हा विषय ऐरणीवर असतानाच दिल्लीत निर्भया प्रकरण घडले व देशातील असंतोषाने कळसाध्याय गाठला. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी सरकारविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन छेडले व त्याला देशभरातून जोरदार पाठिंबा मिळाला. त्याचे राजकीय परिणाम व त्यातून कोणाला फायदा झाला हा इतिहास आपल्याला ज्ञात आहेच. आज पुन्हा त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. देशात वाढत्या महागाईमुळे जनतेमध्ये क्षोभ असतानाच ‘नीट’ परीक्षेचा फुटलेला पेपर, सीबीएसईच्या पेपर तपासणीत दिसून आलेल्या त्रुटी यांमुळे तरुण व विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला. नेमके त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान युवकांना उद्देशून कथित ‘कॉक्रोच’ हा शब्दप्रयोग केला व त्यातून जनतेतील क्षोभाचा उद्रेक झाला नसता तरच नवल. या उद्रेकाला वाट निर्माण होणे गरजेचेच होते व ती निर्माण करून दिली अभिजित दीपके या युवकाने दिलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या पर्यायातून!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com