Cricket :ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेला थेट एन्ट्री?

cricket
cricket esakal

क्रिकेटचा विचार करता, १९००नंतर प्रथमच हा खेळ ऑलिंपिकमध्ये सामील होईल. मध्यंतरी क्रिकेटचा ऑलिंपिक स्पर्धेत समावेश करण्याबाबत विचारविनिमय झाला, परंतु ही संकल्पना तडीस गेली नव्हती. ऑलिंपिक ठरावीक कालावधी निश्चित करून खेळले जाते.

किशोर पेटकर

क्रिकेट ऑलिंपिकमध्ये पुनरागमन करणार आहे. २०२८मधील लॉज एंजलिस स्पर्धेत क्रिकेट खेळणारे सारेच देश सहभागी नसतील. सहा संघांत ही स्पर्धा खेळली जाणार असल्याचे मानले जाते. त्यामुळे पात्रतेसाठी जोरदार चुरस राहील. या स्पर्धेत अमेरिकेचा थेट प्रवेश ठरल्यास इतर पाच जागांसाठी जगातील प्रमुख क्रिकेट देशांत चढाओढ राहील.

क्रिकेट ऑलिंपिकमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यासाठी सव्वाशे वर्षांहून जास्त काळ प्रतीक्षा करावी लागली. नुकतेच मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे (आयओसी) सत्र झाले. त्यात आयओसी कार्यकारी मंडळाने क्रिकेटसह स्क्वॉश, फ्लॅग फुटबॉल, बेसबॉल, लॅक्रॉस या खेळांना २०२८मधील लॉज एंजेलिस ऑलिंपिक स्पर्धेत सामावून घेण्याची शिफारस केली आणि नंतर आयओसीनेही त्यावर मोहोर उठविली.

आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनाही क्रिकेट भावले. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा भारतात सुरू असताना आयओसी सत्र मुंबईत झाले हासुद्धा एक योगायोग ठरला. या खेळाची भारतातील लोकप्रियता पाहून आयओसी पदाधिकारीही अचंबित झाले.

cricket
Neeraj Chopra : नीरजनं दुसऱ्या खेळाडूंचा विचार केला अन्... अन्याय झाला तरी दाखवली खिलाडूवृत्ती!

क्रिकेटचा विचार करता, १९००नंतर प्रथमच हा खेळ ऑलिंपिकमध्ये सामील होईल. मध्यंतरी क्रिकेटचा ऑलिंपिक स्पर्धेत समावेश करण्याबाबत विचारविनिमय झाला, परंतु ही संकल्पना तडीस गेली नव्हती. ऑलिंपिक ठरावीक कालावधी निश्चित करून खेळले जाते.

एकदिवसीय क्रिकेट त्यात कसे सामावणार असाही प्रश्न उपस्थित झाला. कालांतराने टी-२० क्रिकेटची लोकप्रियता गगनाला भिडली आणि अर्ध्या दिवसात संपणाऱ्या सामन्यांमुळे क्रिकेटला ऑलिंपिकचा उंबरठा ओलांडणे शक्य झाले. ऑलिंपिकसाठी टी-१० क्रिकेट चर्चाही मध्यंतरी रंगली होती, परंतु अखेरीस ऑलिंपिक कार्यकारी मंडळास टी-२० क्रिकेटच जास्त पसंत पडले. २०२८मधील लॉज एंजलिस स्पर्धेत क्रिकेट खेळणारे सारेच देश सहभागी नसतील. सहा संघांत ही स्पर्धा खेळली जाणार असल्याचे मानले जाते.

त्यामुळे पात्रतेसाठी जोरदार चुरस राहील. आणखी पाच वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिकचे यजमानपद अमेरिकेकडे असल्याने त्यांना क्रिकेटमध्ये थेट प्रवेश असेल हे स्पष्टच आहे. ऑलिंपिक क्रिकेट स्पर्धेची सविस्तर रूपरेषा अजून ठरत आहे, त्यानंतर स्पष्ट चित्र समोर येईल. अमेरिकेत क्रिकेटच्या लोकप्रियतेसाठी, तसेच हा खेळ तेथे खोलवर रुजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पुढील वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडीजसह अमेरिका टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. आणि त्यानंतरच्या ऑलिंपिक सहभागामुळे अमेरिकेत क्रिकेट चांगलेच फोफावू शकते. व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ (आयसीसी) आश्वासकपणे पाहत आहे.

लॉस एंजलिस ऑलिंपिकमध्ये अमेरिकेचा थेट प्रवेश ठरल्यास इतर पाच जागांसाठी जगातील प्रमुख क्रिकेट देशांत चढाओढ राहील. ऑलिंपिक नियमांनुसार या स्पर्धेत स्वतंत्र देश प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे कॅरिबियन बेटांना वेस्ट इंडीजच्या ध्वजाखाली खेळता येणार नाही.

त्यामुळे बार्बाडोस, गयाना, जमायका, त्रिनिदाद-टोबॅगो, लीवार्ड आयलंड्स, विंडवार्ड आयलंड्स या देशांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ तयार करावा लागेल. वेस्ट इंडीजमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या देशांचे संघ खेळतात, त्यामुळे त्यांना ऑलिंपिक पात्रता फेरी खेळणे कठीण नसेल, फक्त विंडीज क्रिकेटची एकत्रित ताकद दिसणार नाही.

cricket
Olympic :ऑलिंपिक स्पर्धेत आशियायी क्रीडा स्पर्धेपेक्षा भारताला मिळणार जास्त पदके?

राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेत क्रिकेट

१९०० साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश एकदाच झाला. त्यावेळी ग्रेट ब्रिटन व फ्रान्स हे दोनच संघ सहभागी झाले होते. दोन दिवसीय लढतीत ग्रेट ब्रिटनने विजयासह सुवर्णपदकाचा मान मिळविला, तेव्हा त्या लढतीस प्रथम श्रेणी क्रिकेटचा दर्जा देण्यात आला नव्हता. कालांतराने केवळ राष्ट्रकुल देशांतच सामावलेला क्रिकेटचा वृक्ष जागतिक पातळीवर चांगलाच फोफावला.

सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत गुजरातमधील अहमदाबाद येथील अतिभव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंदाजे १.२ लाख क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. यावरून क्रिकेटची भारतासारख्या देशात गगनास भिडलेली लोकप्रियता अधोरेखित होते. क्रिकेट हा अधिकांश राष्ट्रकुल देशांचा खेळ असला, तरी या देशांच्या क्रीडा स्पर्धेत स्थान मिळण्यासाठी क्रिकेटला खूप वाट पाहावी लागली.

अखेर १९९८मध्ये मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटला स्थान मिळाले. त्यानंतर या स्पर्धेतून क्रिकेट रद्द करण्यात आले, आता २०२६मधील स्पर्धेत त्याचे पुनरागमन होईल. २०२२मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या क्रिकेटला पदार्पणाची संधी लाभली. तेव्हा ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक जिंकले, तर भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

१९९८मध्ये पुरुषांचे क्रिकेट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दाखल झाले, परंतु सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा बहाल करण्यात आला नाही. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून सुवर्णपदक जिंकलेल्या या स्पर्धेत क्रिकेट सामने ‘लिस्ट ए’ दर्जाचेच ठरले. आशियाई क्रीडा स्पर्धेचा विचार करता, २०१०मधील हांग् चौऊ व २०१४मधील इंचॉन येथील स्पर्धेत पुरुष व महिला क्रिकेटचा समावेश झाला. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याकडे पाठ फिरविली.

२०१८मधील जकार्ता येथील स्पर्धेत क्रिकेटला डावलले गेले. आता यावर्षी हांग् चौऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागम झाले. भारताचा सहभाग लक्षणीय ठरला. स्पर्धेसाठी दुय्यम पुरुष संघ पाठवूनही भारताने सुवर्णपदक जिंकले, तसेच भारतीय महिलांनीही सोनेरी कामगिरी साकारली.

यावेळच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांना आयसीसीने आंतरराष्ट्रीय टी-२० लढतींचा दर्जा बहाल केला, जी महत्त्वपूर्ण बाब ठरली. त्यामुळे स्पर्धेतील क्रिकेटची प्रतिष्ठाही वाढली. राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेनंतर आता ऑलिंपिक स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश होत असल्याने हा खेळ खऱ्या अर्थाने ऑलिंपिक चळवळीशी जोडला जात आहे.

cricket
Cricket In Olympics : तब्बल 128 वर्षांनी जंटलमन्स गेम परतणार; लॉस एंजेलेस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा खेळ रंगणार?

भारतात ऑलिंपिक आयोजन?

मुंबईत आयओसी सत्राचे उद्‍घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ऑलिंपिक स्पर्धा घेण्याच्या विचारावर भर दिला. २०३६मधील ऑलिंपिक यजमानपद भूषविण्यासाठी भारत देश तयार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात प्रकट केला. ऑलिंपिक हा मोठा क्रीडा महोत्सव आहे, आणि त्याचे आयोजन करण्याचे स्वप्न १४० कोटी भारतीय पाहत आहेत. या सर्वांच्या मनातील भावना आपण मांडत आहोत, असे मोदी म्हणाले.

आयओसीच्या साथीने भारतीयांचे स्वप्न साकार होणार असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी भारताच्या ऑलिंपिक यजमानपदाची मागणी पुढे रेटली. ऑलिंपिक यजमानपदासाठी भारताची मागणी सरस ठरल्यास ती देशातील क्रीडा इतिहासातील अत्युच्च घटना ठरेल. यापूर्वी २०१० साली भारतात राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन झाले, पण दिल्लीतील त्या स्पर्धेत झालेल्या गैरव्यवहारामुळे त्यावेळी देशाची नाचक्की झाली होती.

त्यामुळे ऑलिंपिक यजमानपदासाठी दावा सांगताना आणि तयारीचे सादरीकरण करताना भारताला काटेकोर नियोजनावर भर द्यावा लागेल. २०२९मधील यूथ ऑलिंपिक स्पर्धेत देशात भरविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यूथ ऑलिंपिकचे यजमानपद मिळाल्यास ऑलिंपिक क्रीडा महोत्सव घेण्याचा मार्ग जास्तच सुकर होईल.

एकंदरीत, भारताची क्रीडा क्षेत्रातील पत उंचावत आहे. हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत २८ सुवर्णांसह एकूण १०७ पदके जिंकल्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात भारतीय विक्रम नोंदीत झाला. टोकियो ऑलिंपिकमध्येही सरस कामगिरी झाली.

एका सुवर्णासह एकूण सात पदके मिळाली. भालाफेकीत नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स गाजवत आहे. इतर खेळाडूही पुढे सरकत आहेत. अशा परिस्थितीत देशाला ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यास १४० कोटी लोकसंख्येचा हा देश क्रीडा महासत्ता होण्याचेही स्वप्न पाहू शकतो.

-----

cricket
Olympics In India: भारत भूषवणार ऑलिंपिकचे यजमानपद ? वाचा काय आहे मोदींचा प्लॅन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com