Premium|Global economy & your wallet : जागतिक अर्थव्यवस्थेतील मोठे बदल आणि तुमच्या घरातील बजेटवर होणारा त्याचा थेट परिणाम

Global Economy Impact on Daily Budget : जागतिक आर्थिक घडामोडींचा सामान्य माणसाच्या खिशावर आणि दैनंदिन बजेटवर कसा थेट परिणाम होतो, याचे सविस्तर विश्लेषण.
Global economy & your wallet

Global economy & your wallet

esakal

Updated on

डॉ. अमेय खरे

आज स्थानिक बाजारपेठ आणि जागतिक अर्थव्यवस्था यांच्यातल्या सीमा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही पेट्रोलचा दर वाढल्याची बातमी ऐकाल किंवा डॉलर मजबूत झाल्याचं वाचाल, तेव्हा लक्षात ठेवा, की जागतिक अर्थव्यवस्था ही कुठेतरी दूर घडणारी गोष्ट नाही. ती आपल्या घराच्या बजेटपर्यंत पोहोचलेली वास्तव प्रक्रिया आहे.

पुण्यातल्या एका किराणा दुकानात डाळीचे दर अचानक वाढतात. पेट्रोल पंपावर दर पुन्हा बदलतात. मोबाईल फोन काही महिन्यांत महाग होतो. दुसऱ्या बाजूला अमेरिकेत व्याजदर वाढल्याची बातमी येते, चीनमधले कारखाने मंदावल्याची चर्चा होते, किंवा मध्यपूर्वेत तणाव वाढल्याचं दिसतं. वरकरणी या गोष्टी एकमेकांशी संबंधित वाटत नाहीत. पण प्रत्यक्षात आजची अर्थव्यवस्था इतकी परस्परांशी जोडलेली आहे, की जगाच्या एका भागात घडलेली घटना काही दिवसांत थेट आपल्या खिशावर परिणाम करू शकते.

पूर्वी स्थानिक बाजारपेठ मुख्यतः स्थानिक गरजांपुरती मर्यादित असायची. गावात तयार होणाऱ्या वस्तू गावात विकल्या जायच्या. शेतमाल जवळच्या बाजारात विकला जायचा. पण गेल्या काही दशकांत जागतिकीकरण, तंत्रज्ञान आणि वाहतूक व्यवस्थेतील बदलांमुळे जगातील अर्थव्यवस्था एकमेकांशी अधिक वेगानं जोडल्या गेल्या. आज आपण वापरत असलेल्या अनेक वस्तू एका देशात तयार होत नाहीत, उदाहरणार्थ, एखाद्या मोबाईलचं डिझाईन अमेरिकेत तयार होतं, त्यातली चिप तैवानमध्ये तयार होते, असेम्ब्ली चीनमध्ये होते आणि विक्री भारतात होते. म्हणजे एका साध्या मोबाईलमागे अनेक देशांची अर्थव्यवस्था जोडलेली असते. म्हणूनच ‘जागतिक अर्थव्यवस्था’ हा शब्द आता केवळ मोठ्या उद्योगांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com