Premium|Stock Market & Energy Outlook : होर्मुझ तणावामुळे शेअर बाजार दिशाहीन, ऊर्जा क्षेत्रात मात्र मोठी संधी

Stock Market Under Hormuz Tension : भारतीय शेअर बाजारावर जागतिक घडामोडींचा प्रभाव वाढत असून होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव, ऊर्जा क्षेत्रातील संधी आणि अमेरिकेच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
Stock Market & Energy Outlook

Stock Market & Energy Outlook

esakal

Updated on

डेटा सेंटर्सना चालना द्यायची असेल व कृत्रिम बुद्धिमत्तेला प्राधान्य द्यायचे असेल, तर वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात वाढवायला हवी. पुढील चार वर्षांत ५०० गिगावॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे सरकारचे ध्येय आहे. साहजिकच या क्षेत्रातील सर्व उद्योगांना सुगीचे दिवस आहेत हे नक्की. त्यात निर्मिती, पारेषण व त्यांच्या पूरक उद्योगांना मोठी संधी आहे.

गर्दीच्यावेळी पुण्यात मंडईतील आणि मुंबईत भायखळातील ट्रॅफिक पार करणे किती जिकीरीचे आहे, हे आपण जाणतोच. वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रत्येकच शहरात हा प्रश्‍न आहे. तसाच ट्रॅफिक जाम होर्मुझच्या सामुद्रधुनीत गेला महिनाभर आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचाही गेले काही दिवस चक्काजाम झाला आहे. हा ट्रॅफिक जाम सुटल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. शेअर बाजार दिशाहीन आहे, हे आपण जाणतोच. मार्चअखेरीला फारच खाली गेल्यामुळे अनेक शेअर आकर्षक किमतीला मिळत होते. निफ्टी व निफ्टीबाहेरील शेअरमध्ये एप्रिलमध्ये तेजीची एक झुळूक आली आणि पंaटर्सची छाती रुंदावली. मात्र संपूर्ण मे महिनाभर तेजी वाकुल्याच दाखवत होती. गेल्या महिन्यात निफ्टीने २३२०० ते २४००० ही रेंज ओलांडली नाही.

Stock Market & Energy Outlook
Premium|Inflation and rupee value : वाढती महागाई आणि रुपयाचे मूल्य; रिझर्व्ह बँकेची डॉलर बाजारातील मोठी खेळी
Stock Market & Energy Outlook
Premium|Global Economy and Fuel Hike : ट्रम्प-जिनपिंग भेटीनंतर जागतिक बाजारात हालचाली; भारतीय गुंतवणूकदारांनो सावध राहा!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com