Marathon :पहिल्यांदा मॅरेथॉनमध्ये धावताय? तर मग या गोष्टी नक्की करा

running timetable
running timetable esakal

तुम्हालाही मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा आहे, पण तयारी कुठून आणि कशी करावी याबाबत माहिती नाही. हळूहळू प्रॅक्टिस करायला कशी सुरुवात करावी आणि ती कशी वाढवत न्यावी याविषयी या लेखात माहिती देण्यात आली आहे. तसेच अनेकांचे अनुभव देखील प्रेरणा देणारे आहेत..

वर्षा आठवले

नुकतीच जयंत सोनोने याने सातारा हाफ हिल मॅरेथॉन पूर्ण केली. साताऱ्याहून जवळपास ६०० किलोमीटरवर असणाऱ्या अमरावतीहून जयंत या मॅरेथॉनसाठी साताऱ्यात येऊन गेला. साताऱ्याची ही हाफ हिल मॅरेथॉन प्रसिद्ध आहे ती यवतेश्वरच्या, कास पठाराकडे नेणाऱ्या अवघड पण तितक्याच रम्य घाटासाठी.

सातारा मॅरेथॉनच्या आधी २१ किलोमीटर रन केलेला असावा, शिवाय किमान चार महिने घाट चढणीची प्रॅक्टिस असावी ह्या अगदी प्राथमिक अपेक्षा. या मॅरेथॉनविषयी जयंत म्हणाला, ‘गेलं साधारण वर्षभर प्रॅक्टिस करतो आहे, पण हिल मॅरेथॉन केली नव्हती. आमच्या इथं जवळच्याच एका टेकडीवर धावायला जायचो.

आठवड्यातून तीन दिवस कोअर ट्रेनिंग तर तीन दिवस रन असायचा.’ जयंतने ग्रुपसोबत अशी प्रॅक्टिस केली आणि तो साताऱ्यात दाखल झाला. तो सांगतो, की प्रत्यक्ष धावताना सातारा हिल मॅरेथॉन किती अवघड आहे हे पहिल्या ७-८ किलोमीटरमध्येच लक्षात आलं. इतका अवघड घाटरस्ता असेल, असं वाटलंच नव्हतं.

मॅरेथॉनच्या आधी तयारीसाठी काही काळ देणं आवश्यक असतं. तुमची तब्येत उत्तम असेल, कुठले आजार नसतील, आरोग्याच्या तक्रारी नसतील तरी १०,१५,२०,२१ आणि ४२ या प्रत्येक टप्प्यासाठी तयारी लागतेच.

अमरावती रोड रनर्स ग्रुप असं जयंतच्या ग्रुपचं नाव. सेवानिवृत्त विक्रीकर साहाय्यक आयुक्त दिलीप पाटील यांनी हा ग्रुप सुरू केला. मुंबईतून सुरुवात करून निवृत्तीनंतर त्यांनी अमरावतीतही रनिंगविषयी जागृती केली आणि ग्रुप तयार केला. आता या ग्रुपमध्ये जवळपास ८०-९० जण असल्याचं जयंत सांगतो. ज्यांना रनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग आवडतं असे ३५ ते ४० जण या दोन्हीसाठी नियमित येत असल्याचं तो सांगतो.

running timetable
Marathon News : सातारा हिल मॅरेथॉनमध्ये दरवर्षी बारामतीकरांचा वाढतोय सहभाग...

पुण्यातल्या मैत्रेयी वाडगेने डिसेंबरमध्ये पहिला रन केला तो पाच किलोमीटरचा. त्यासाठी आठवड्यातले तीन दिवस रन, दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग असं शेड्यूल मैत्रेयीनं फॉलो केलं. ट्रेनिंगच्या पहिल्याच दिवशी पहिला धडा होता तो रस्त्यावरच्या दिव्याच्या एका खांबापासून दुसऱ्या खांबापर्यंत धावत जायचा.

‘सुरुवातीला कंटाळा करत करत ट्रेनिंगला जायचे. कशाला पहाटे वगैरे उठून जायचं असं वाटायचं. माझं फिल्ड मॉडेलिंग, अॅक्टिंगचं. त्यामुळे तब्येत फिट राखणं हे तर अगदी महत्त्वाचंच. तिथं मला याचा खूप फायदा झाला. त्यासाठी मग स्ट्रेंथ ट्रेनिंग, रनिंग हे सगळं मी चालू ठेवलं.

त्यामुळे आता जाणवतं, की चेहऱ्यावर एक ग्लो असतो, दिवसभर अॅक्टिव्हनेस जाणवतो, फ्रेश वाटतं,’ ती सांगते. मैत्रेयीने आता मॅरेथॉनमध्ये भाग घेणं कमी केलंय पण तिच्या ग्रुपच्या पद्धतीनुसार आठवड्यातून तीन दिवस धावणं हे तिच्या रोजच्या जीवनाचा भाग बनून गेलं आहे.

अमरावती, नागपूर, यवतमाळ, अहमदनगर, सातारा या ठिकाणीही रनिंग करणाऱ्यांचे ग्रुप आहेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक ग्रुपचं आठवड्यातून दोन वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतलं जातं तर तीन वेळा रन.

पाच किलोमीटरची पहिली मॅरेथॉन करायची तर एक शेड्यूल फॉलो करायला सांगितलं जातं. (टेबल पाहा) मात्र, तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घेऊनच हे ट्रेनिंग करावे. चार आठवड्यांच्या अशा ट्रेनिंगनंतर कोणाही तंदुरुस्त व्यक्तीला किमान पाच किलोमीटर अंतर रन/ वॉक करत पूर्ण करणे शक्य होऊ शकते.

running timetable
Marathon: प्रॅक्टिस केली आणि त्या मॅरेथॉनमध्ये १० किलोमीटर धावलो..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com