

PSU Bank Stock Valuation
Esakal
बिहारच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी व अमित शहा द्वयीने निःश्वास टाकला असेल. आता कुठलीही धाकधूक न वाटता इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूक करता येईल. खजिन्यावर अतिरिक्त भार पडणार आहे, तो कमी करण्यासाठी अर्थ मंत्रालय नव्या क्लृप्त्या घेऊन येईल ह्याची तयारी ठेवली पाहिजे.
भारत देशाची रास मकर आहे, असे म्हणतात. मकर राशीला गेली साडेसात वर्षे साडेसाती सुरू होती, ती २९ मार्च २०२५ रोजी शनी मीन राशीत गेल्यामुळे संपली. पण पुढे १३ जुलै रोजी शनी वक्री झाला. साडेसाती संपली तरी मकर राशीची आव्हाने संपेनात. आता तो शनिदेव २८ नोव्हेंबरपासून मार्गी होत आहे. तरी या महिनाअखेर फलज्योतिष्याच्या दृष्टीने साऱ्या अडचणी दूर होतील असे दिसते. ज्योतिष शास्त्रावर विश्वास असो व नसो, ट्रम्प ह्यांची टोपी किंचित सरळ झालेली दिसते खरी!