एकट्याचा पावसाळा

पावसामुळे पाचोळासुद्धा तजेलदार वाटू लागतो, हे तुम्ही कधी अनुभवलंय का?
rainy session
rainy sessionsakal

माधव गवाणकर

‘...पावसानंतर सप्तरंगी रेनबोही दिसणार आहे, हे का नाही मनात येत? अंगावर येणारा पावसाळा, हा काही कायमचाच ऋतू नव्हे. नंतर लेमन यलो उन्हाचे तलम क्षणही अनुभवायला मिळणार आहेत म्हटलं!’ मी स्वतःशीच असं म्हणत परत उजळतो, उगवतो, उमलतो. ‘भा.रा.’वून तांबेंच्या कवितेतील ‘पंख पाचूचे मोरांना’ ओळ आठवतो. माझाच हळूहळू मोर बनू लागतो.

पावसाच्या आवाजाची एक अखंड कोसळती लय असते. ‘लय’ म्हणता म्हणता तिचा ‘प्रलय’ व्हायला वेळ लागत नाही. पण संततधार पाऊस, नुसता ऐकत राहणं मला खूप आवडतं. मी पावसाकडे बघत नाही.

मी पावसाकडे काही मागत नाही. मी बिगरशेती आहे. मी रेडिओ ऐकावा तसं पावसाचं सुगम संगीत ऐकत राहतो. पावसामुळे पाचोळासुद्धा तजेलदार वाटू लागतो, हे तुम्ही कधी अनुभवलंय का? वाढत्या गढूळ पाण्यात झाडांची पडलेली पानं स्वतःच होड्या होऊन पुढं पुढं जातात. ही पानं आता जुनीपानी झाली आहेत.

जणू मी वजनावर दिलेली रद्दी. जाऊन ती कुठं जातील? नापास झाल्यावर गणिताच्या उत्तरपत्रिकेच्या प्रत्येक पानाची होडी करून मी धावत्या पाण्यातच सोडली होती. ती चुकलेली अगणित गणितं कुठं गेली?.... आयुष्याचं गणित मात्र बरोब्बर आहे!

rainy session
Nagpur News : कर्जवाटपात बँकांच्या जाचक अटींचा खोडा; अर्धे कर्ज सावकारांनीच वाटले

पाऊस ढगात बसून प्रवास करतच आलेला असतो. त्याचं असं जगात कुणी नसताना तो इतकं का बरसतो? पाऊस बाई आहे की बाप्या? लिंगभेद, लिंगभाव यापल्याड जाणारं स्वच्छ आभाळ आपण शोधणार तरी कधी?

पावसात चिंचेला हुडहुडी भरते. त्या चिंचेवर एकही पाखरू-लेकरू थांबत का नाही? ते मला अजून कळलेलं नाही. वनशास्त्राच्या त्या मास्टरला माहीत असेल का? पण तो तर पीएच.डी.साठी केरळला जाऊन राहिलाय.

चिंब चिंब झालेली, निथळणारी चिंच भुताखेताची म्हणून वाळीत पडलीय. तिच्याशी एकदा नीट बोलायला हवं. हिस्टेरिक बाईमाणूस मनातून कोंडलेलं असतं. गुंता असतो सगळा. पुरुष बाईशी इतक्या कोमलतेनं बोलू शकतो का? मातृहृदयी असेल तर बालू शकतो आणि मी तसा आहे. साने गुरुजी फार मोठा माणूस, पण त्यांचा एक सूक्ष्म अंश माझ्यात असला पाहिजे.

मलाही कधी कधी एकाकीपणा घेरतो. पावसाळ्यात घराच्या पेटीतून बाहेर पडता येत नाही, तेव्हा तर जास्तच भेडसावतं एकटेपण. पण मग मी स्वतःशीच बोलतो, स्वतःलाच समजावतो, ‘माधवा, मित्रा, सिंगल राहणं ही तुझीच आवड, निवड होती ना?

rainy session
Nagpur News : वाहनांवर आकारले जाणार प्रवेश शुल्क

मुलांची गोड गोड गाणी रचणाऱ्या, ‘गम्माडी गंमत, जम्माडी जंमत’ गाण्यातून सांगणाऱ्या प्रिय आईला, आशा गवाणकरांना तू तुझा हा चॉइस सांगितला होतास ना? मग आता हे मळभ का येतं? काळोखच का दिसतो? नंतर सप्तरंगी रेनबोही दिसणार आहे, हे का नाही मनात येत? अंगावर येणारा पावसाळा, हा काही कायमचाच ऋतू नव्हे.

नंतर लेमन यलो उन्हाचे तलम क्षणही अनुभवायला मिळणार आहेत म्हटलं!’ मी स्वतःशीच असं म्हणत परत उजळतो, उगवतो, उमलतो. ‘भा.रा.’वून तांबेंच्या कवितेतील ‘पंख पाचूचे मोरांना’ ओळ आठवतो. माझाच हळूहळू मोर बनू लागतो. मी स्वतःला पक्ष्यांमधील एक मानू लागतो.

फार उंच उडत नसलो, मान्यताप्राप्त; नामवंत नसलो तरी हवेत तरंगू शकतो आणि तेही कोणतंच पेयपान न करता!काजवे माझ्या चिमुकल्या, माझ्यापुरत्या जुन्या घरट्यात शिरतात. चमकदार काजवे उडत येतात, उडत जातात. ते उडणारे सगळे नर आहेत.

rainy session
Nagapur : माजी आमदाराला मिळालेले सन्मान, पुरस्कार भंगारात

निसर्गात मादीला जे फिकट, स्वरशून्य किंवा नुसतीच अंडी व पिल्लं सांभाळणारं रंगरूप व जीवनशैली मिळालीय, ती मला तिच्यावर अन्याय करणारी वाटते. तिलाही गावंसं वाटतं. तिलाही जास्वंदीचा गडद भडक रंग धारण करावासा वाटतो. तिलाही तुरा आणि पिसारा हवा असतो. पण एकूणच निसर्ग तिला तशी अनुमती देत नाही.

‘मी गृहिणी आहे’ हे सांगता नाही काही बायका स्वरातून ओशाळतात. ‘घरीच असते’, असा तो फील असतो. नोकरी सोडून गेलेल्या सहकारी प्राध्यापिकेला मी म्हटलं होतं, ‘तू ‘हाऊस वर्क’ शब्द वापरू नको.

‘हाऊस जॉब’ म्हण. जॉबच आहे तो. तू घर सांभाळतेस म्हणून तुझी विद्वत्ता कमी होत नाही..’ आणि आता तर काय, टॉपरबाई लॅपटॉपवर ‘वर्क फ्रॉम होम’सुद्धा करते. मुक्त पत्रकाराला कसलं आलंय बंधन आणि जाच?

मी तर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तरंगत उडून जातो. एकदा तर एक पत्रकार मला म्हणालाही, ‘अहो, तुम्ही कोकणात सगळीकडेच लिहीत राहता. याला काय अर्थ आहे?’ ...त्याचं म्हणणंही काही खोटं नाही.

rainy session
Nagpur News : भिडे यांच्यावर कारवाई करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ः भाजपशी त्यांचा संबंध नाही

बायकोला ‘सगळं काही’ सांगून बसलेला जुना स्नेही धुवांधार पावसातच कॉफी उकळायला माझ्याकडे येतो. तो बायसेक्शुअल आहे आणि त्याच्या बायकोला हे माहीत आहे. तिनं इलाज नाही म्हणून त्याच्या या ‘दुहेरी’ जीवनाचा स्वीकार केला असणार.

मी कधी तिच्याशी या विषयावर बोललेलो नाही. पण बाईची हतबलता मला त्या केसस्टडीमध्येही जाणवली. ती फार शिकलेली नाही. तिला नोकरी नाही. पदरात लहान मुलगी आहे. म्हणूनच ती हे सहन करतेय, असं वाटतं.

एखादं व्यसन सहन करावं तसं! मी नॉनव्हेज जेवण केलं तर तो जेवूनच जातो. मी केलेली साधी कॉफीसुद्धा त्याला खूपच आवडते. माझ्याबद्दल त्याला काडीचं आकर्षण नाही. आम्ही फक्त मित्र आहोत आणि अशी शुद्ध मैत्रीच सुरेख असते. गुंतागुंत नाही. स्त्री आणि पुरुष यांच्यात असं मैत्र कधी दिसेल? ...प्रश्न श्रावण झुल्यावर झुलत राहतो!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com