छान गुणवत्ता असणारं आयुष्य हवं आहे? रोजच्या जगण्यात करा हे १० छोटे बदल

जगण्यात काय मोठं नि काय छोटं हे शोधण्यापेक्षा काय महत्त्वाचं हे समजलं तर जास्त मदत होते. म्हणून माझ्या आयुष्यात मला काय महत्त्वाचं वाटतं, याचा शोध महत्त्वाचा.
take care of your mind
take care of your mind esakal

डॉ. संज्योत देशपांडे

कोणतीही गोष्ट जेव्हा संपत येते तेव्हा मन अनेक गोष्टींचा धांडोळा घ्यायला लागतं. तसंच काहीसं वर्षाअखेरीस होतं.

गेल्या वर्षीच्या क्षणांमध्ये काय गवसलं आणि काय निसटून गेलं याचा धांडोळा घेताना आतून असं वाटायला लागतं, की या नव्या वर्षी एक नवी सुरुवात करावी.

आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा द्यावी. त्यामुळे वर्षाअखेरीस संकल्पांची आठवण येतेच येते...

  • या सगळ्यात, मनातला खूप आत डोकावलेला प्रश्न खरंतर हाच असतो की मला आता कसं जगायचं आहे?

  • माझ्या जगण्याला मला कसा आकार द्यायचा आहे?

  • मला खरंच काय साध्य करायचं आहे?

खूप मोठं असं काही करावं असं खूप जणांना वाटत असतं. पण जगण्यात काय मोठं नि काय छोटं हे शोधण्यापेक्षा काय महत्त्वाचं हे समजलं तर जास्त मदत होते. म्हणून माझ्या आयुष्यात मला काय महत्त्वाचं वाटतं, याचा शोध महत्त्वाचा.

take care of your mind
लहान मुलांनी अस्थिर, चंचल असणं हे ADHD चे लक्षण आहे का?

आपण किती जगायचं आहे यावर आपलं नियंत्रण नाही पण कसं जगायचं आहे यावर तर नक्कीच आहे ना?

मला एक खूप छान गुणवत्ता असणारं आयुष्य जगायचं आहे का? तसं असेल तर मी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपल्या रोजच्या जगण्यातले अगदी छोटे छोटे (पण महत्त्वाचे) बदलही ही गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत करत असतात. हे बदल करून तर पहा..

मनाची काळजी घ्या - मानसिक पातळीवर स्वतःला काय वाटत आहे याची दखल घ्या. मनाची काळजी घेण्याची ती पहिली पायरी आहे.

स्वतःचा स्वीकार - स्वतःचा विनाशर्त स्वीकार स्वतःमध्ये बदल करण्यासाठी मदत करतोच, पण मानसिक आरोग्याचा तो एक महत्त्वाचा घटक आहे.

सजगता - आपल्या पाचही इंद्रियांचा वापर जगण्याचा समृद्ध अनुभव घ्यायला मदत करतो आणि सतत भूतकाळ किंवा भविष्यकाळात भटकंती करणाऱ्या मनाला वर्तमानात जगायला मदत करतो.

मनाच्या आरोग्यासाठी पूरक सवयी - व्यायाम, झोप, आहार, मेडिटेशन, छंद जोपासणं या गोष्टी मानसिक आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.

मला जाणवणाऱ्या भावना/ माझं वर्तन ही माझी जबाबदारी - आपल्या भावना आणि वर्तनाची जबाबदारी आपण स्वीकारली तर कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद मिळते.

take care of your mind
LGBTQ Community : "आमचं लग्न आता लीगल होईल का?" लेस्बियन कपलने शेअर केला Emotional Video

माफ करायला शिका - मनात दबून राहिलेले राग, नात्यांना बसलेल्या गाठी माफ करता आलं तर निघून जातात. मनावरचं नको असलेलं ओझं कमी करतात.

रोज कृतज्ञता व्यक्त करा (Gratitude Journal) - रोज कृतज्ञता व्यक्त करण्याने आपल्या जगण्यातल्या सकारात्मक गोष्टींची आपण दखल घेतो ज्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढायला मदत होते.

स्वतःच्या क्षमतांना चालना द्या - यामुळे आपला विकास तर होतोच पण हे करताना तन्मयतेचे जे क्षण अनुभवायला येतात त्याने जगण्यातलं समाधान ही वाढतं.

कम्फर्ट झोन सोडा - जगण्यातलं साचलेपण वाढू द्यायचं नसेल आणि खऱ्या अर्थाने जगण्याला सामोरं जायचं असेल तर कम्फर्ट झोन सोडायलाच हवा.

जगण्यातली अर्थपूर्णता शोधा - मला कोणत्या गोष्टी अर्थपूर्ण वाटतात त्याचा शोध घेत रहा आणि त्या करा.

या गोष्टी ‘छोट्या’ वाटल्या तरी त्या महत्त्वाच्या आहेत आणि जगण्याच्या गुणवत्तेत भर घालणाऱ्या आहेत.

-------------------

take care of your mind
Emotional Breakdown : सततच्या 'इमोशनल ब्रेकडाऊन' मुळे 'फॅमिली टाइम' नकोसा झालाय..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com