Bike Ride : 'हे' ६ गॅजेट वापरल्याने 'बाईक ट्रिप' होईल अविस्मरणीय!

प्रत्येक ट्रिप खऱ्या अर्थाने मेमोरेबल होण्यासाठी, आपल्या दुचाकीमध्ये योग्य तंत्रज्ञान आणि सोबतीला काही गॅजेट असणे आवश्यक आहे.
bike ride
bike rideesakal

भल्या पहाटे गाडीला किक मारून मित्रमंडळींसोबत लॉंग ड्राईव्हला जाण्याची मजा काही औरच! पण असा ड्राईव्ह आठवणीत राहण्यासाठी टेक्नॉलॉजीच्या बरोबरीने गॅजेटही तितकेच महत्त्वाचे आहेत.

सागर गिरमे

केवळ मोठ्या गाडीत बसणे आणि एखाद्या टुरिस्ट स्पॉटवर जाणे आणि तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहणे ही पर्यटनाची कल्पना तरुणाईसाठी आता जुनी होऊ पाहात आहे.

फिरण्याच्या या संकल्पनेची जागा आता थ्रिलिंग बाईक ड्राईव्हनी घेतलेली आहे. बाईकवरून लाँग ड्राईव्हला जाणे किंवा अगदी मोठ्या, लांबच्या ट्रिपा करणे अगदी नवीन नसले तरी आता या बाईक ड्राईव्हना ग्लॅमर मिळते आहे.

त्याचे कारणही तसेच आहे. रॉयल एन्फिल्ड, केटीएम, हार्ले यांसारख्या कंपन्यांच्या हायएंड दुचाक्या भारतात उपलब्ध होऊन त्या लोकप्रियही व्हायला लागल्या आहेत.

मित्रांसोबत अशा गाड्या घेऊन वीकएंडला भल्या पहाटे गाडीला किक (आता स्टार्टरही दाबून) मारून बाईक टूरला जाण्याचा ट्रेंड परदेशाप्रमाणे सध्या आपल्याकडेही ‘इन थिंग’ आहे.

आता कोणत्याही शनिवारी -रविवारी मोठ्या संख्येने एकामागोमाग एक वेगात जाणारे हे बायकर आकर्षणाचा विषय आहेत.

ह्या बाईक टूर थ्रिलिंग असल्या तरी चारचाकी वाहनांच्या तुलनेत काहीशा धोकादायकही आहेत. त्यासाठी बाईकवरून होणारी प्रत्येक ट्रिप खऱ्या अर्थाने मेमोरेबल होण्यासाठी, आपल्या दुचाकीमध्ये योग्य तंत्रज्ञान आणि सोबतीला काही गॅजेट असणे आवश्यक आहे.

ट्रॅक्शन कंट्रोल

बाईक टूर करताना ऑफ रोडिंगला जास्त प्राधान्य दिलं जातं. हायवेवर एक वेग राखून गाडी चालविण्याचा आनंद वेगळा पण डोंगर उतारावरून, चिखलातून, दगड-धोंड्यांतून ऑफ रोडिंगचा आनंद ड्राईव्हचं आगळंच समाधान देऊन जातो! पण अशा प्रकारचे ड्रायव्हिंग करताना गाडीला ट्रॅक्शन कंट्रोल असणे अत्यंत आवश्यक असते.

अनेक कंपन्यांच्या हायएंड बाईकमध्ये ही टेक्नॉलॉजी असते. मात्र त्याखालोखाल असलेल्या बाईकमध्ये ही टेक्नॉलॉजी नसल्याने ब्रेक लावल्यावर, अधिक अॅक्सिलरेट केल्यावर किंवा उतारावर रायडरचा कंट्रोल सुटून गाड्या घसरून अपघात होतात.

मात्र ट्रॅक्शन कंट्रोल टेक्नॉलॉजीमुळे गाड्या घसरत नाहीत आणि अशा अपघातांची शक्यता नगण्य होते.

स्मार्ट रायडिंग जॅकेट

सुरक्षेच्या दृष्टीने हे जॅकेट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. शहरात आपण सर्रास सनकोट घातलेले दुचाकीस्वार बघतो, पण या सनकोटचा उपयोग उन्हापासून, फार तर धुळीपासून संरक्षण मिळवण्यासाठी होतो. हायएंड बाईक हायवेला किमान शंभर किलोमीटर प्रतितास वेगाने पळवताना अपघात झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.

मात्र रायडिंग जॅकेट बायकरला अशा जीवघेण्या अपघातातून वाचवू शकते. या जॅकेटमधील सेन्सर अचानक वाढणारा किंवा कमी होणारा वेग तसेच अपघाताचा धक्का मोजू शकतात.

त्यामुळे अशी स्थिती आल्यास मानवी शरीर आणि मानेभोवती जॅकेटमधील एअर बॅग फुगतात. सोबतच जॅकेटमध्ये वापरण्यात आलेल्या मटेरियलमुळे शरीराच्या इतर भागांवर होणारा आघातही कमी होतो.

bike ride
VIDEO : भारीच की! भाव्वा, हा तर 'Biker Doggie' व्हिडिओ पाहाल तर थक्क व्हाल!

जीपीएस ट्रॅकर

मोटरसायकल टूरमधील एक सर्वात मोठी शक्यता म्हणजे हायएंड बाईक चोरीला जाणे. वाहनचोरांच्या दृष्टीने चारचाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकी चोरणे हे अत्यंत सोपे काम.

मात्र आपल्या गाडीच्या बाबतीत असे घडून नये म्हणून हा जीपीएस ट्रॅकर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. हायएंड बाईकमध्ये जीपीएस ट्रॅकर असतात.

गाडी खरेदी करताना गाडीबरोबर जीपीएस ट्रॅकर मिळाला नाही तर आफ्टर मार्केट खरेदी करणे सयुक्तिक ठरते. अशा ट्रॅकरमुळे गाडीचे लोकेशन तर कळतेच, सोबतच लाइव्ह स्ट्रिमिंग आणि ट्रीप अॅनालिसिस यांसारखे फिचरही त्यात असतात.

हेड-अप डिस्प्ले

बाईक राईड करताना सुरक्षेच्या दृष्टीने पहिली पायरी म्हणजे हेल्मेट असणे. मात्र हेल्मेट अधिक कन्व्हीनियंट होण्यासाठी हेड-अप डिस्प्ले अत्यंत उपयुक्त ठरतात.

वेगात असताना स्पिडोमीटरवर बाईक वेग पाहताना, बाईक चालविताना फोन वाजला तर तो कोणाचा आहे हे बघण्यासाठी किंवा इतर काही कारणांनी रस्त्यावरून नजर हटल्याने आजवर अनेक अपघात झाले आहेत.

मात्र हेड-अप डिस्प्ले असल्यास रायडरचे लक्ष विचलीत होणे टळू शकते. हा डिस्प्ले रायडरला नॅव्हिगेशनबाबत माहिती, गाणी ऐकवणे, कॉल अलर्टबरोबर अगदी रिअर व्ह्यू कॅमेरा फीडदेखील दाखवू शकतो. हा डिस्प्ले ब्लूटूथने हेल्मेटशी कनेक्ट राहातो.

bike ride
E-Bike : पेट्रोल, डिझेल, चार्जिंगविना धावणार ई-बाईक; वाघोली येथील शेतकऱ्याच्या पोराचा देशी जुगाड

स्वयंचलित आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली (AERS)

हायवेवरून जाणाऱ्या वाहनांना बऱ्याचदा दुचाकीचा अपघात झाल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू होऊ शकतो.

मदतीसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यात दुचाकीस्वार एकटाच असेल तर स्थिती आणखीनच गंभीर होते. पुण्याजवळील एका घाटात नुकतीच अशीच एक घटना घडली होती.

पण अशी स्थिती येऊ नये म्हणून स्वयंचलित आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली (Automatic Emergency Response System -AERC) जीवरक्षक ठरू शकते.

एईआरसी सेन्सर अपघात झाल्याचे ओळखून आपत्कालीन संपर्क क्रमांकावर अपघाताच्या ठिकाणासह अलर्ट पाठवतात. त्यामुळे योग्य वेळेत मदत मिळून रायडरचा जीव वाचू शकतो.

bike ride
Horse Riding : पुण्यातील दोन मित्रांची एशियन गेमसाठी निवड

हेल्मेट ब्रेक लाइट

रायडरच्या सुरक्षिततेसाठी दृश्यमानता वाढवणे महत्त्वाचे आहे. विशेषतः प्रकाश कमी असताना मागून येणाऱ्या गाड्यांना रायडर दिसणे आवश्यक असते.

एलईडी हेल्मेट लाइट हा त्यावरील प्रभावी मार्ग आहे. रायडर ब्रेक लावतो, त्यावेळी हे लाइट लागतात. त्यामुळे मागील वाहनांच्या चालकांना त्यांच्या पुढे असणारा रायडर दिसू शकल्याने अपघाताचा धोका टळतो.

रायडर-फोकस्ड् अॅप

या प्रकारचे मोबाईल अॅप बायकरना विशेष मदत करतात. रिअल टाइम हवामान बदल, योग्य मार्ग अशा माहितीबरोबर रायडरना ही ॲप वापरून एकमेकांशी समन्वयही साधता येतो.

यासोबतच रस्त्याची परिस्थिती, संभाव्य धोके आणि इतर रायडरचे ठिकाणही समजते. त्यामुळे सुरक्षित प्रवासाला हातभार लागतो.

---------------------

bike ride
Rahul Gandhi Bike Riding : राहुल गांधींची बाईक सवारी! चालले थेट लडाखमधील पँगाँग लेकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com