
निरोगी आरोग्यासाठी रोज किती चालायचे, याचे काही ठोकताळे आहेत का? काही फिटनेस प्रेमी म्हणतात, की रोज दहा हजार पावले चालणे गरजेचे आहे. मात्र, नुकतेच एका संशोधनानुसार सिद्ध झालेय, की दररोज सात हजार पावले चालणाऱ्या व्यक्तींचा मृत्यूचा धोका सुमारे ४७ टक्क्यांनी कमी होतो. एवढेच नाही, तर कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, मधुमेह, रक्तदाब इत्यादींसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो... पण, सात हजार पावले चालणे खरेच उपयोगी आहे का?
रोज काही मिनिटे किंवा काही पावले चालणे आरोग्यासाठीचा सुपरपॉवर मानले जाते. आपण दररोज चालतो; पण घरकाम, कार्यालय, बाजार, बस पकडणे इत्यादी रोजच्या नित्यनियमाने केल्या जाणाऱ्या प्रक्रियेकडे आपण व्यायाम म्हणून कितीदा पाहतो?