Interior Design बेडरूमचे इंटेरियर करताना या गोष्टींची घ्या काळजी...

एका साध्या पण थीम असलेल्या बेडरूममध्ये प्रकाशाने एक अनोखा अनुभव आपण येणाऱ्या पाहुण्यांना देऊ शकतो
बेडरुमचे इंटिरिअर
बेडरुमचे इंटिरिअरEsakal

बेडरूममध्ये सर्वसाधारण मास्टर बेडरूम, पॅरेंट बेडरूम, चिल्ड्रेन्स बेडरूम आणि गेस्ट बेडरूमचा समावेश होतो. यांच्यामध्ये त्या बेडरूममधील व्यक्ती, त्यांचे वय, सवयी याप्रमाणे याची विभागणी केली जाते व त्याचप्रमाणे त्यांचे Interior Design व प्रकाश योजना केली जाते. Plan Interior Design of Bedroom by proper lighting

उदा. पालकांच्या किंवा वडीलधाऱ्या मंडळीच्या बेडरूममध्ये Bedroom वयोमान लक्षात घेऊन प्रकाशाची Light घनता बाकी बेडरूमपेक्षा जास्त ठेवून व पांढऱ्या रंगाचा मुख्यतः वापर केला जातो, तर 'चिल्ड्रेन्स' बेडरुममध्ये कुल कलर्स, ट्रेन्डी आकार व त्याबरोबर दोन रंगामध्ये प्रकाशयोजना केली जाते.

यामुळे त्या जागेला एक पेपी फिल देण्यात येतो. तर गेस्ट बेडरूम्स या सर्वसाधारण बाकी घराच्या Interior Design प्रमाणे किंवा जर आदरातिथ्यात वेगळेपण दाखवायचे असेल, तर एका साध्या पण थीम असलेल्या बेडरूममध्ये प्रकाशाने एक अनोखा अनुभव आपण येणाऱ्या पाहुण्यांना देऊ शकतो.

बेडरूमचे डिझाईन करताना त्याची दोन विभागांत विभागणी करावी. बेडरूममध्ये प्रवेश करताच पूर्ण उंचीचा वॉड्रोब निवडावा. याच्यामध्ये कपडे, वस्तू यांची मांडणी पूर्णपणे होईल याची काळजी घेतली जावी. छतामधून एलईडीची प्रकाशयोजना करताना आपल्याला आतील वस्तू पूर्णपणे नीट दिसतील अशी करावी.

हे देखिल वाचा-

बेडरुमचे इंटिरिअर
Bedroom Essentials: या 5 खास गोष्टी प्रत्येक बेडरूममध्ये असाव्यात

इथेच या वॉड्रोबच्या समोर एक दुधी काचेचे छोटसं भिंतीवरील कपाट ठेवून त्यात रोजच्या लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी सोय करावी. दुधी काच घेतल्याने याला वेगळ्या प्रकाशयोजनेची गरज भासत नाही.

यानंतर आपण बेडरूमच्या मुख्य खोलीतील मांडणी पाहुयात. या खोलीत पांढऱ्या रंगाचा ठराविक रीतीने उपयोग केला जायला हवा. ज्यामुळे भिंती दिवसाच्या स्वच्छ पांढऱ्या रंगानी उजळतात, तर आतील अॅक्सेसरीज जसे बेडशीट, पडदे हे थोड्या गुलाबी रंगाच्या छटेमध्ये आपले अस्तित्व जपतात. सर्व भिंतीमध्ये बेडच्या समोरील भिंत ही पांढऱ्या पण थोडा काळपट, पिवळ व ग्रे रंगाच्या फ्लोरल पॅटर्नमुळे एक वेगळा कॉन्ट्रास्ट निर्माण करते.

खिडकीच्या मोठ्या जागेचा उपयोग तिथे बसण्यासाठी एक आयताकृती फ्रेम बनवून केला जावू शकतो. त्यात एक मोठे छिद्र पाडून त्यात एक पारदर्शी वास बसवण्यात यावा. आता प्रकाशामुळे आपण इथे वेगवेगळे सिन्स तयार करू शकतो. प्रसन्न वातावरण निर्मितीसाठी आपण इथे ठराविक ठिकाणी परावर्तित प्रकाशाची सोय करू शकता.

ज्यामुळे येथील भिंती व इतर वस्तू या मंदपणे उजळून निघतील व वातावरणात एक शांतता जाणवेल. आता मूड थोडा रोमँटिक करण्यासाठी इथे वास व त्याच्याखाली असणारे पांढरे पेबल्स हे दोन्ही निळसर रंगाच्या छटेमध्ये न्हाऊन निघतील अशी प्रकाशरचना करण्यात यावी. बेडच्या बाजूस दोन निमुळते हैंगिंग फिटिंग्स हे त्या जागेला उबदारपणाची झालर देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com