खडकवासला धरणाचे 11 दरवाजे पावणेदोन फुटाने उघडले, 16 हजार 247 क्यूसेकचा विसर्ग

Khadakwasala-Dam
Khadakwasala-Dam

खडकवासला - खडकवासला धरण साखळीत आज गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. बुधवारी दिवसभर पडलेल्या पावसाच्या तो चौपट ते सहापट पडला. खडकवासला धरणात सुमारे 17 हजार क्यूसेक पाणी येत असल्याने विसर्ग देखील वाढला आहे. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता 11 दरवाजे सुमारे पाऊणे दोन फुटाने उघडले असून त्यातून 16 हजार 247 क्यूसेकचा विसर्ग मुठा नदीत सोडला जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारी सकाळी सहा संध्याकाळी पाच वाजता या अकरा तासात खडकवासला 5,पानशेत 22, वरसगाव 20, टेमघर येथे 25 मिलिमीटर पाऊस झाला होता. आज गुरुवारी सकाळी ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत याच अकरा तासात खडकवासला 29, पानशेत 82, वरसगाव 81, टेमघर येथे 60 मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजे खडकवासला येथे सहा पटीने, तर पानशेत, वरसगाव येथे चार पटीने तर टेमघर येथे दुपटीने पाऊस  पडला. परिणामी खडकवासल्याचा विसर्ग 856 क्यूसेक होता. तो आज 16 हजार 247 क्यूसेक झाला आहे. म्हणजे कालच्या पटीत तो 20 पटीने जास्त आहे. 

सकाळी सहा वाजता 856 क्यूसेक असलेला विसर्ग एक 712 क्यूसेक  केला. आठ वाजता पाच 136, दुपारी बारा वाजता सात हजार 276, संध्याकाळी पाच वाजता 11 हजार 704 क्यूसेक व सात वाजता 16 हजार 247 क्यूसेक करण्यात आला आहे.

सध्याचा विसर्ग आणि 600 क्यूसेक पाणी योजनेसाठी मिळून सुमारे 16 हजार 847 क्यूसेक येवा आहे. चार ही धरणात मिळून 20.04 टीएमसी म्हणजे 68.73 टक्के पाणी जमा झाले आहे.

धरण साखळी आणि परिसरात सलग 24 तास मुसळधार पाऊस कोसळतोय. पानशेत धरण 76.58 टक्के, वरसगाव 62.97 टक्के टेमघर 49.50 टक्के भरले आहे.

दरम्यान, पुलावरून पाणी जाण्याची शक्यता असल्याने उत्तमनगर पोलिसांनी दुपारी बारा वाजता मुठा नदीवरील शिवणे- नांदेड पूल वाहतुकीस बंद केला.

गुरूवारी संध्याकाळ ची धरणस्थिती
धरणाचे नाव- धरणाचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी मध्ये)/ आज अखेर जमा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी मध्ये)/ टक्केवारी

  • खडकवासला- 1.97/1.97/100
  • पानशेत- 10.65/8.15/76.58
  • वरसगाव- 12.83/8.07/62.97
  • टेमघर- 3.71/1.84/49.50

चार ही धरणाची मिळून उपयुक्त पाणीसाठा 29.15 टीएमसी आज अखेर उपयुक्त जमा पाणीसाठा 20.04टीएमसी 68.73टक्के झाला आहे.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com