पुण्यातील धक्कादायक प्रकार; वडील अभ्यास कर म्हटल्याने मुलाने सोडले घर

जनार्दन दांडगे
Wednesday, 14 October 2020

लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे बारा वर्षांचा अल्पवयीन मुलगा सुखरुप घरी. वडील अभ्यास कर म्हणाल्याने मुलाने घर सोडले होते

लोणी काळभोर (पुणे) : अभ्यासाची सक्ती केल्याने आई-वडीलांच्यावर नाराज होऊन फुरसुंगीहून दौंड तालुक्यातील मामाच्या गावाला पायी निघालेला बारा वर्षीय शाळकरी मुलगा, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आई-वडीलांच्या घरी पोहचला. 

‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

पोलिस हवालदार मुकुंद रणमोडे व पोलिस वार्डन सुशांत वरळीकर ही त्या मुलाला घरी सोडणाऱ्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यामधील पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हा प्रकार लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (ता. १४) सकाळी ९ वाजण्याच्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ घडला आहे. 

आई-वडील सतत अभ्यास कर म्हणत असल्याने फुरसुंगी (ता. हवेली) येथील बारा वर्षीय चिंटु (नाव बदलले आहे), आईवडीलांच्यावर नाराज होऊन बुधवारी (ता. १४) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फुरसुंगीहून दौंड तालुक्यातील कुरुकुंभला पायी चालत निघाला होता. चिंटुचे आई व वडील दोघेही मोलमजूरी करुन घऱ चालवतात. दरम्यान घरातून आठ वाजता निघालेला चिंटु पाच किलोमीटर अंतर पार करुन, नऊ वाजण्याच्या सुमारास कवडीपाट टोलनाक्याजवळ पोचला. टोलनाक्यावर पोचताच रस्त्यावरुन वेगात धावणारी वाहने पाहुन चिंटु बावरला व रस्त्याच्या एका बाजूला जाऊन रडू लागला.

Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

त्याचवेळी टोलनाक्यावरुन पोलिस ठाण्याकडे जाणाऱ्या पोलिस हवालदार मुकुंद रणमोडे यांची नजर चिंटुवर पडली. बारा वर्षीय मुलगा रस्त्याच्या एका बाजूला रडतोय म्हणजे काहीतरी गंभीर घडले असावे असे वाटल्याने, रणमो़डे यांनी चिंटुजवळ जाऊन त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. चिंटुने सुरवातीली बोलण्यास आढेवेढे घेतले. मात्र रणमोडे यांची विचारपुस करताच, आई-वडीलांच्यावर नाराज होऊन फुरसुंगीहून मामाच्या गावाला पायी निघाल्याचे रणमोडे यांना सांगितले. 

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

दरम्यान रणमोडे यांनी ही बाब पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांना कळवून, चिंटुला लोणी स्टेशन येथे नेले. त्या ठिकाणी रणमोडे व सामाजिक कार्यकर्ते रामा भंडारी या दोघांनी चिंटुला खाऊ घातले. व त्याची अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. चिंटु फुरसुंगी परीसरातील असल्याचे लक्षात येताच, रामा भंडारी यांनी चिंटुबद्दलची माहिती व्हॉटस्अपवर टाकून शेअरही केली. रामा भंडारी यांनी शेअर केलेली माहिती फुरसुंगीमधील एका सामाजिक कार्यकत्य्राने पाहुन, चिंटुच्या घरच्यांना सांगितली. तसेच मुलाला नेण्यासाठी पोलिस ठाण्यात येत असल्याचे कळविले. दरम्यान चिंटुचे आईवडील पोलिस पोचताच, मुकुंद रणमोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलाला व त्याच्या आईवडीलांना स्वतःच्या वाहनातुन घरी सोडविले. या कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी मुकुंद रणमोडे व पोलीस वार्डन सुशांत वरळीकर या दोघांचे कौतुक केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 12-year-old boy is safe at home due to the vigilance of Loni Kalbhor traffic police