बाप रे!... कोरोनाचे २२०० रुग्ण गायब

ज्ञानेश सावंत
Saturday, 15 August 2020

कोरोनावर घरीच उपचार घेत असलेले (होम आयसोलेशन) २,२८९ रुग्ण गायब असल्याचे उघडकीस आले आहे. या रुग्णांचा पत्ता महापालिकेला सापडत नसून, रुग्णांचे मोबाईलही ‘नॉट रिचेबल’ आहेत. दरम्यान, या रुग्णांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे.

पुणे - कोरोनावर घरीच उपचार घेत असलेले (होम आयसोलेशन) २,२८९ रुग्ण गायब असल्याचे उघडकीस आले आहे. या रुग्णांचा पत्ता महापालिकेला सापडत नसून, रुग्णांचे मोबाईलही ‘नॉट रिचेबल’ आहेत. दरम्यान, या रुग्णांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेचे स्वॅब कलेक्‍शन सेंटर आणि खासगी लॅब व्यवस्थापनांच्या बेजबाबदारपणामुळे या रुग्णांची पुरेशी माहिती उपलब्ध झाली नाही, हे कारण महापालिका देत आहे. तर ‘स्वॅब’ घेतलेल्या प्रत्येकाची नोंद घेऊन ती महापालिकेला दिल्याचे खासगी लॅब व्यवस्थापन सांगत आहे. 

स्वातंत्र्यदिनी केंद्रीय क्रीडामंत्री करणार 'फीट इंडिया' मोहिमेचा श्रीगणेशा!

कोरोनाची सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असलेल्यांना घरीच उपचार घेण्याची (होम आयसोलेशन) सुविधा आहे. त्यासाठी रुग्णांची वैयक्तिक माहिती विशेषत: मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता आणि अन्य आजारांची माहिती महापालिकेकडे देणे अपेक्षित आहे. त्यानुसार ‘स्वॅब’ घेतानाच त्या नोंदी घेतल्या जातात. त्यावरून घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या सपंर्कातील नागरिकांची तपासणी केली जाते. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे; परंतु गेल्या आठवडाभरात नोंद झालेल्या सव्वादोन हजार रुग्णांच्या नोंदीच महापालिकेला सापडत नाहीत.

पुणेकरांनो, उद्या भोरच्या भटकंतीची प्लॅन विसरा

महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘‘रुग्णांची नोंद ठेवून त्यांच्या उपचाराला प्राधान्य दिले जात आहे. प्रत्येक रुग्णापर्यंत आम्ही पोचत आहोत. त्यांच्या कुटुंबासह इतर ठिकाणी संपर्कात आलेल्यांची तपासणी करीत आहोत. ज्यांची नोंद नाही, अशा घटनांमध्ये संबंधित लॅबशी संपर्क करीत आहोत.’’

पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या अडचणी काही कमी होईनात; रक्तसाठा पडतोय कमी!

पोलिसांची नजर आहे, तरी...
घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांवर पोलिसही नजर ठेवत आहेत. त्यांच्या संपर्कात राहून ते घराबाहेर पडले नाहीत ना, याची खात्री पोलिस यंत्रणा करीत आहे. त्याचवेळी काही रुग्णांशी संपर्क होत नसल्याने महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या अडचणी वाढल्या आहेत. या रुग्णांचा शोध घेण्याचा आदेश वरिष्ठांनी दिल्याने आता गुन्हे शाखेच्या पोलिसांमार्फत रुग्ण शोधण्यात येणार आहेत. 

लॉकडाऊनमध्ये गंभीर गुन्हे घटले पण...; काय सांगतो पुणे पोलिसांचा रिपोर्ट

कोरोनाची रुग्णस्थिती
१४,७१२ हॉस्पिटलमधील 
७,००० घरी उपचार घेणारे  
२,२८९ गायब झालेले

शहरातील सगळ्या रुग्णांची नोंद आहे. त्या प्रत्येकाची नावे आहेत. मात्र, ज्यांच्या घराच्या पत्त्याच्या नोंदी नाहीत, अशा रुग्णांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करीत आहोत. त्यामुळे ज्या प्रमाणात म्हणजे, १२ ते १५ टक्के ट्रेसिंग करणे अपेक्षित आहे; ते करीत आहोत. 
- डॉ. वैशाली जाधव 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2200 corona patients missing in pune