esakal | २३ वर्षाचा तरूण कोरोनामुळे दगावला; पुण्यातील जाणून घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Patient

शहरात आतापर्यंत 55 हजार 150 नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी झाली असून, त्यातील 7 हजार 265 कोरोना झाल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

२३ वर्षाचा तरूण कोरोनामुळे दगावला; पुण्यातील जाणून घ्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील कोरोनामुक्तांच्या संख्येत गुरुवारी (ता.4) आणखी 157 जणांची भर पडल्याने आतापर्यंत साडेचार हजार जणांना घरी सोडण्यात आले. दिवसभरात नवे 176 रुग्ण सापडले असून, विविध रुग्णालयातील 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- पुणे : शहरातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत मनपा आयुक्त काय म्हणाले पाहा!

धक्कादायक म्हणजे, मृतांमध्ये येरवड्यातील 23 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत सव्वासात हजार रुग्णांची नोंद झाली तरी; त्यातील 2 हजार 399 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिवसभरात 1 हजार 441 नागरिकांचे 'स्वॅब' घेण्यात आले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी हॉस्पिटलमधील 176 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर त्यातील 40 रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. 

- इंटरनेट गंडल्याने 'वर्क फ्रॉम होम'मध्ये खोडा; नोकरदारांसोबत नागरिकही वैतागले!

येरवड्यातील 23 वर्षाच्या तरुणाला 28 मे ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोरोना झाला. उपचारादरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला असून, त्याला कोरोनासह मूत्रपिंडाचाही त्रास होता. याच भागातील 61 वर्षांच्या पुरुषाचाही मृत्यू झाला असून, त्यांना 25 मे ला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या व्यक्तीला हदयरोग आणि मधुमेहाचा त्रास होता. अन्य मृतांना कोरोनासह इतर आजार होते. 

- बारावीच्या विद्यार्थ्यांनो, फिजिक्स विषयाचा नवीन अभ्यासक्रम कसा आहे? जाणून घ्या

शहरात आतापर्यंत 55 हजार 150 नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी झाली असून, त्यातील 7 हजार 265 कोरोना झाल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. मात्र, त्यातील 4 हजार 505 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 361 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 2 हजार 399रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

- जगभरातून आणखी ३८ विमाने मुंबईत येणार; आतापर्यंत 'एवढ्या' नागरिकांना केले 'एअरलिफ्ट!'

दिवसभरातील नवे रुग्ण 176 
एकूण उपचार सुरू असलेले रुग्ण  2 हजार 399 
दिवसभरातील कोरोनामुक्त  157 
एकूण कोरोनामुक्त  4 हजार 505 
दिवभरातील मृत  11 
एकूण मृत  361 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

loading image