धक्कादायक! मुलाला सोडण्यासाठी २५ लाखांची मागणी (व्हिडिओ)

Akash-Khutwad
Akash-Khutwad

पुणे - इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असतानाच मुलगा घर सोडून गेला... त्यानंतर एका माणसाने २५ लाखांची मागणी केली... तो फोन पोलिसांसमोरच रेकॉर्ड झाला... आता याला वर्ष होईल. पण, मुलगा काही सापडत नाही... पोलिस म्हणताहेत शोध सुरू आहे... सांगा आकाशला कसं शोधायचं, असा प्रश्‍न भानुदास खुटवड यांनी उपस्थित केला अन्‌ त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या...

मूळचे नायगाव (ता. भोर) येथील; पण सध्या सहकारनगर इथं राहत असलेले भानुदास खुटवड यांचा मुलगा आकाश २ जानेवारी २०१९ रोजी मामाच्या गावाला चाललोय, असं सांगून निघून गेला. त्यानंतर त्याचा कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळं खुटवड यांनी धनकवडी पोलिस चौकीत तक्रार दिली. तेथील पोलिसांनी सहकारनगर ठाण्यात ती वर्ग केली. त्यानंतर खुटवड यांनी तिथं चौकशी केली.

दरम्यान, तीन-चार दिवसांनी खुटवड यांना हिंदीत बोलणाऱ्याचा फोन आला अन्‌ त्यानं २५ लाखांची मागणी केली. विशेष म्हणजे, त्यांनी अनेकदा मुलाला माझ्याशी बोलू द्या; मग मी पैसे जमवून तुमच्याकडं देतो, असं सांगितलं. मात्र, समोरची व्यक्ती काय तयार होईना. दरम्यान, त्यानंतर दोन-तीन दिवस पैशांसाठी फोन येत होते अन्‌ हे सर्व फोन सहकारनगर पोलिस ठाण्यात रेकॉर्डही झाले. त्यानंतर एकदाही फोन आला नाही. 

याबाबत खुटवड म्हणाले की, माझा मुलगा आकाश भारती विद्यापीठामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. मात्र, घरातून निघून गेला अन्‌ पैशांसाठी फोन सुरू झाले. मी रिक्षाचालक आहे. त्यामुळे २५ लाख रुपये कुठून आणणार? तरीही मी फोन करणाऱ्यांना पैसे देतो, असं सांगत होतो. पण, ते ऐकायला तयार नव्हते.

‘तुम्ही पैसे अकाउंटमध्ये जमा करा. तुमचा मुलगा आम्ही दादर स्टेशनजवळ सोडतो,’ असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर तीन-चार दिवस फोन केले. पण, नंतर फोनही बंद झाले. त्यामुळे वर्षापासून आम्ही आकाशचा शोध घेत आहोत. पण, तो सापडला नाही. ‘तुमचा मुलगा त्याच्या मनानं आला तर येईल,’ असं पोलिस सांगतात. त्यामुळं काय करावं, हेच कळत नाही. कधी एकदा आकाश भेटेल, याची आतुरता आम्हाला लागली आहे अन्‌ हे सर्व पोलिसांच्याच हातात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com