Lockdown : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 'नो-एन्ट्री'; जिल्ह्यातील आणखी २७ गावे 'सील'!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्यास त्या भागात दिलेली सूट तात्काळ बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

पुणे : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे सील केली आहेत. त्याचपाठोपाठ जिल्हाधिकारी यांनीही कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यातील ५ तालुक्यातील एकूण २७ गावेही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील इतर सर्व नागरिकांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जारी केले आहेत.

- पुणे : नव्या 80 रुग्णांची पडली भर; दिलासादायक गोष्ट म्हणजे...!

जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्ह्यात यापूर्वीच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र कोरोना बाधित रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्ह्यातही प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

- Exclusive : सुप्रिया सुळे म्हणतात, ''आता 'ही' लाईफस्टाईल स्वीकारू!''

दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्यास त्या भागात दिलेली सूट तात्काळ बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

क्षेत्र - प्रतिबंधित करण्यात आलेला भाग

१) पुणे महानगरपालिका - संपूर्ण पुणे शहराची हद्द

२) पिंपरी-चिंचवड महापालिका - संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराची हद्द

३) बारामती नगरपरिषद - संपूर्ण बारामती नगरपरिषद हद्द

- तापाची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका, उपचारासाठी महापालिकेची ३६ रुग्णालये आहेत सज्ज!

४) हवेली तालुका - जांभूळवाडी, वाघोली, आव्हाळवाडी, बावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी, कोळेवाडी, कोल्हेवाडी, नर्हे, खानापूर, लोणीकंद, उरुळीकांचन, पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडी.

५) शिरूर - विठ्ठलवाडी, शिक्रापूर

६) वेल्हा - निगडे , मोसे

७) भोर - नेरे

८) जुन्नर - डिंगोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 27 villages in Pune district have been declared as restricted areas