Coronavirus : त्या तिघांचे १४ दिवस पूर्ण; उद्या होणार नमुन्यांची पुन्हा तपासणी

Coronavirus : त्या तिघांचे १४ दिवस पूर्ण; उद्या होणार नमुन्यांची पुन्हा तपासणी

पिंपरी - कोरोनापासून लवकरात लवकर मुक्तता व्हावी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परदेशातून आलेल्या आणि होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांनी लक्षणे दिसत असल्यास स्वतः हून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. संशयित व्यक्तींच्या घशातील द्रव्यांच्या नमुन्यांची तपासणी तुलनेने कमी होत आहे का? याचीही माहिती घेतली जात असून तपासणीसाठी नागरिकांना आवाहन केले जात असल्याचेही त्यांनी ' सकाळ' शी बोलताना सांगितले. 

महापालिकेच्या वाय सीएम व भोसरी रुग्णालयात कोरोंना संशयितांची तपासणी केली जात आहे. त्यांच्या घशातील नमुने पुण्यातील एन आय व्ही लॅबमध्ये तपासणी साठी पाठविले जात आहेत. बुधवारपर्यंत (ता. २५) १४८ जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत. १२ नमुन्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे. १३६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. त्यांना होम क्वा र न टाई न राहण्याचे आदेश दिलेले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या १३ व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. 

तपासणी कमी होतेय? 
पुणे व मुंबईच्या तुलनेत पिंपरी चिंचवड मधील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या शुक्रवारपर्यंत (ता. २०) सर्वाधिक १२ होती. तेव्हापासून बुधवारपर्यंत (ता. २५) म्हणजेच गेल्या पाच दिवसात एकही पॉझिटीव्ह आढळला नाही. त्यामुळे शहरातील संशयितांची तपासणी कमी प्रमाणात होत आहे की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त ' सकाळ' शी बोलताना म्हणाले, 'तपासणी कमी होत आहे का? याची माहिती घेतली जात आहे. बुधवारपर्यंत सुमारे बाराशे व्यक्तींना होम क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या घरी सर्वेलियांन पथक नियमितपणे जात आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तपासणी केली जात आहे. मंगळवारपर्यंत ११६० जण क्वारंटाईन केले होते. त्यांच्याशी डॉक्टरांनी थेट संपर्क साधला. प्रकृतीची विचारपूस केली. कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.''

नागरिकांनी पुढे यावे
परदेशातून आलेले, होम क्वारंटाईन असलेले व लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांनी स्वतः हून पुढे यावे व तपासणी करून घ्यावी. यासाठी वाय सी एम व भोसरी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू आहे, असेही हर्डीकर यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांची मदत
कोरोना ची तपासणी व व्यक्तींच्या घशातील नमुने घेण्यासाठी शहरातील आठ खासगी रुग्णालयांची मदत घेतली आहे. त्यांना नमुने घेण्याची परवानगी दिली आहे. यात थेरगाव मधील बिर्ला रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील पिंपरी, लोकमान्य रुग्णालय चिंचवड व निगडी, ग्लोबल हॉस्पिटल काळेवाडी फाटा, संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल मोशी व स्टरलिंग हॉस्पिटल निगडी प्राधिकरण निरामय हॉस्पिटल चिंचवड स्टेशन यांचा समावेश आहे. तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी एप तयार केले आहे. त्याचा वापर सुद्धा नागरिक करू शकतात. 

व्हेंटिलेटर सुविधा 
वाय सीएम व भोसरी रुग्णालयात आयसोलेशन सुविधा आहे. जिजामाता रुग्णालयातील व्यवस्थाही पूर्ण झाली आहे. तिन्ही रुग्णालयात प्रत्येकी १५ बेड अतिदक्षता विभाग तयार आहे. ४० व्हेंटिलेटर सुविधा आहेत. सुमारे अडीच हजार बेड विविध ठिकाणी क्वारंटाईन साठी उपलब्ध आहेत. नवीन जगांचाही शोध सुरू आहे. शहरातील खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहेत. ५० बेड, १०० बेडच्या रुग्णालयांची व डॉक्टरांची यादी तयार आहे. प्रसंगी सेवा निवृत्त डॉक्टरांची मदत घेण्याची तयारी असून त्यांच्याशी बोलणे झालेले आहे, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. 

त्यांचे अहवाल आज
शहरात सुरवातीला तीन जन कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यांच्या १४ दिवसांचे विलागिकरन बुधवारी पूर्ण झाले. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणी साठी पाठविले आहेत. त्यांचा अहवाल उद्या मिळणार आहे. ते निगेटिव्ह आल्यास पुढच्या २४ तासात पुन्हा तपासणी केली जाईल. तोही अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडले जाईल, अन्यथा आणखी १४ दिवस विलगीकरन कक्षात ठेवले जाईल, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. 

तो स्वतः झाला कोरोनटाईन
महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन ८८८८००६६६६ वर बुधवारी सकाळी कॉल आला, 'साहेब आमच्या बिल्डिंग मध्ये एक जण न्युझीलंड येथून आला आहे.'' महापालिका पथक अधिकाऱ्यांसह पोहचले. संबधित व्यक्ती तिसऱ्या मजल्यावर राहत होती. अधिकाऱ्यांनी आवाज दिला. ती व्यक्ती घराच्या गॅलरी तून बोलली, 'साहेब मी होम कोरोण टाईन आहे. हा बघा शिक्का.'' त्याच्या विषयी अधिक माहिती घेतली. त्या वेळी कळले की, सदर व्यक्ती न्युझीलंड येथून आली तेव्हापासून एकटीच घरात राहत आहे. त्यांची पत्नी व दोन मुले वेगळ्या ठिकाणी रहायला गेले आहेत. केवळ दोन वेळ जेवणाचा डबा घेवून त्यांची पत्नी येते. व डबा देवून  लगेच निघून जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com