पाऊस पडू लागल्याने पोलीस पाटील आडोशाला थांबले अन् तेवढ्यात...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

सोन्या ढोरे याने पिस्तुलातून झाडलेली गोळी, वाळुंज यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ लागल्याने ते जखमी झाले.

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथील माजी सरपंचांच्या, पोलीस पाटील असलेल्या पतीवर, राजकीय वैमनस्यातून पिस्तुलाने गोळी झाडण्यात आली. ही घटना रविवारी (ता.२८) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात पोलिस पाटलाच्या हाताला दुखापत होऊन, ते जखमी झाले आहेत.

- ते आले, दारू प्यायले अन् 'त्याच्या' डोक्यात दगड घालून पसार झाले!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या, सचिन भिवसेन वाळुंज (वय ३८) यांनी स्वतःच याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वाळुंज यांना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठेकेदार संजय कौटकर यांनी, पाण्याची टाकी बांधण्याची जागा दाखविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बोलावून घेतले.

- पुण्यात आत्महत्यांच्या घटना वाढताहेत; हॉटेल कामगाराने हॉटेलमध्येच घेतला गळफास

दरम्यान पाऊस आल्याने ते जवळच्या इमारतीच्या छताखाली बोलत उभे होते. त्यावेळी सौरभ ऊर्फ सोन्या अनिल ढोरे, विपुल भिमाशंकर थिगळे, अतुल ऊर्फ बंटी काळूराम भांबुरे (सर्व रा. वरची भांबुरवाडी, ता. खेड), हे तिघेजण त्याठिकाणी आले. सोन्या ढोरे याने पिस्तुलातून झाडलेली गोळी, वाळुंज यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ लागल्याने ते जखमी झाले. तेथून ते त्यांच्या गाडीकडे पळत जात असताना विपुल थिगळे आणि अतुल भांबुरे यांनी त्यांना दगड फेकून मारले. 

- म्हशीच्या दुधाला मिळाला ६२ रुपये एवढा उच्चांकी दर; कोणता दूधसंघ देतोय एवढा दर?

वाळुंज यांच्या पत्नी माधुरी वाळुंज गावच्या, २०१६ ते २०१९ दरम्यान सरपंच असताना, त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून वाळुंज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच त्यांनी तत्कालीन उपसरपंचांवर अविश्वास ठराव आणला, म्हणून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा राग होता. त्यातून आपल्यावर जीवे मारण्याच्या हेतूने हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 persons fired shots on Police Patil out of Political enmity at Bhamburwadi in Khed Taluka