esakal | माळेगावात जुगाराच्या क्लबवर पोलिसांची धाड; 33 जणांना घेतले ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

33 arrested in Raid on gambling club in Baramati

​कोरोनाच्या काळात इतक्या मोठ्या संख्येने एखाद्या क्लबमध्ये लोकांनी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात जुगाराचा क्लब सुरु असतानाही बारामती तालुका पोलिसांना याची माहितीच नव्हती, यावर लोकांचा विश्वास नसून अकार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. ​

माळेगावात जुगाराच्या क्लबवर पोलिसांची धाड; 33 जणांना घेतले ताब्यात

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानउघाडणी केल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पोलिसांनी काल माळेगाव येथील जुगाराच्या क्लबवर धाड टाकत तब्बल 33 जणांवर गुन्हे दाखल केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या काळात इतक्या मोठ्या संख्येने एखाद्या क्लबमध्ये लोकांनी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात जुगाराचा क्लब सुरु असतानाही बारामती तालुका पोलिसांना याची माहितीच नव्हती, यावर लोकांचा विश्वास नसून अकार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे खडे बोल ऐकावे लागल्याने काल त्यांनी स्वताःच या जुगाराच्या क्लबवर धाड टाकली. एकाच वेळेस इतक्या मोठ्या संख्येने लोक जुगार खेळण्यासाठी आलेले पाहून स्वताः शिरगावकरही चक्रावून गेले होते.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; काय आहे वाचा

उपमुख्यमंत्र्यांनी पोलिसांची कानउघाडणी का केली होती, याचा प्रत्यय खुद्द डीवायएसपींना आल्यानंतर आता अवैध व्यावसायिकांवर धडक कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे. 

निष्काळजीपणाचा ‘व्हायरस’ पसरतोय

स्थानिक पोलिसांना खबरच नाही....
डीवायएसपींनी माळेगावच्या जुगाराच्या क्लबवर धाड टाकताना गोपनीयता बाळगली, बारामती तालुका पोलिसांच्या हद्दीत हा भाग येतो, मात्र त्या पैकी कोणालाच या कारवाईत सहभागी करुन घेण्यात आले नाही, हेही विशेष आहे. दरम्यान आता या प्रकाराबाबत तालुका पोलिसांना खुलासा करावा लागणार असून अनेकांवर आता संक्रांत येणार अशी चर्चा आहे. 

आयटी पार्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज कोणत्या भागात, किती रुग्ण आढळले पाहा

शहरातही अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरुच...
बारामती शहरातही अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरुच आहेत. तक्रार आली तरच कारवाई हे पोलिसांचे सूत्र असल्याने व कोणी तक्रार करण्यास धजावत नसल्याने राजरोस हे व्यवसाय सुरुच राहतात. कारवाईत सातत्य नसल्याने पुन्हा व्यवसाय नव्या जोमाने सुरु होतात. 

पुणेकरांनो, घराबाहेर पडताय? रेनकोट, छत्री सोबत असु द्या, कारण...

नागरिकांचा विश्वासच नाही.....
ज्या जुगाराच्या क्लबमध्ये 33 जण आढळतात, असे क्लब पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय सुरु असू शकतील, यावर बारामतीकरांचा विश्वासच नाही. सगळ्या जगाला जे व्यवसाय दिसत असतात, ते पोलिसांनाच नेमके कसे दिसत नाहीत, असेही प्रश्नचिन्ह या निमित्ताने लोकांनी उपस्थित केले आहे. 

लॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क