पुणे : कार्डवरील आकड्यांची बेरीज करायला सांगून पावणे पाच लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

  • वेगवेगळी कारणे सांगून नागरीकांची पावणे पाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

पुणे : वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगून नागरीकांची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक होण्याचा प्रकार थांबण्याचे चिन्हे नाहीत. नोकरी, विवाह, बक्षिसासह डेबीट व क्रेडीट कार्डच्या क्रमांकाची बेरीज करण्यास सांगून नागरीकांची फसवणुक करण्यात आली आहे. काही दिवसात शहरामध्ये वेगवेगळी कारणे दाखवून दोन महिलांसह तिघांची तब्बल पावणे पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नव्याने खरेदी केलेले कपडे पुन्हा बदलून घेण्यासाठी वेबसाईटवरील क्रमांकाद्वारे कंपनीशी संपर्क साधवाऱ्या महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी धनकवडी येथे राहणाऱ्या 46 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी ओजाला ऑनलाईन शॉपींग या कंपनीकडून फिर्यादीनी कपडे खरेदी केली होती. मात्र काही कपड्याचे माप कमी असल्याने ते परत करण्यासाठी त्यांनी इंटरनेटवरुन संबंधीत कंपनीचा ग्राहक सेवा केंद्राचा संपर्क क्रमांक घेतला. त्यावर संपर्क साधून कपडे बदलून घेण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी फिर्यादी यांना बॅंक खाते क्रमांक व डेबीट कार्ड क्रमांक यांची बेरीज करून आलेली संख्या किती आहे, असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यानंतर फिर्यादी यांच्या बॅंक खात्यातुन एक लाख रुपयांची रक्कम अनोळखी व्यक्तींनी काढून घेतली. 

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

तरुणीला लग्नाचे आमिष दाखविल्यानंतर ओळख वाढवून अनोळखी व्यक्तीने तिची तब्बल अडीच लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी उंड्री येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने अनोळखी व्यक्तीविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 पासून सुरू आहे. फिर्यादी यांनी विवाहासाठी विवाहा नोंदणी करणाऱ्या संकेतस्थळावर स्वतःबद्दल माहिती दिली होती. त्यावरुन अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी संपर्क साधला. लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर आपण भारतात आलो असून विमानतळावर सीमाशुल्क विभागात तत्काळ पैसे भरायचे असल्याचे कारण सांगून फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी अडीच लाख रुपये घेतले. फिर्यादी यांनी नंतर संपर्क साधला, त्यावेळी त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली. शुन्य क्रमांकावरुन संबंधीत प्रकरण तपासासाठी कोंढवा पोलिस ठाण्याकडे दाखल करण्यात आले आहे. 

खरंच, पाकिस्तानातील गैरमुस्लिमांची संख्या २३% वरुन ३.७%वर घसरली का?

ओएलएक्‍सवर जाहीरात करण्यात आलेली बुलेट ही दुचाकी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाही अनोळखी व्यक्तींनी सव्वा लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी प्रसाद घोरपडे (वय 21, रा. कर्वेनगर) यांनी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांना बुलेट घ्यायची होती. त्याचवेळी त्यांना ओएलएक्‍सवर एका बुलेटची जाहीरात आढळली. त्यानुसार, त्यांनी दुचाकीच्या मालकाशी संपर्क केला. त्यावेळी त्याने फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करुन वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपये ऑनलाईन माध्यमाद्वारेकाढून घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4.45 lakh online fraud saying with various reasons in Pune