esakal | भारीच की ! बारामतीतील 550 विद्यार्थ्यांना मिळाली पदवी अगोदरच नोकरी
sakal

बोलून बातमी शोधा

college.jpg

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आता कँपस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण होण्याअगोदरच नोकरीच्या पटापट संधी मिळू लागल्या आहेत.

भारीच की ! बारामतीतील 550 विद्यार्थ्यांना मिळाली पदवी अगोदरच नोकरी

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आता कँपस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण होण्याअगोदरच नोकरीच्या पटापट संधी मिळू लागल्या आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना नोकरीसाठी दारोदार भटकावे लागायचे, आता मोठ्या कंपन्या चांगल्या उमेदवारांच्या शोधार्थ महाविद्यालयांची दारे ठोठावू लागली आहेत. 

मोठी बातमी : 'या' पाच प्रभागांतील निम्म्या पुणेकरांना कोरोनाची लागण; सर्व्हेतून पुढे आली माहिती!

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील 550 विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षात कँपस प्लेसमेंटच्या माध्यमातून उत्तम रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. एकीकडे मंदीचे संकट घोंघावत असतानाही या महाविद्यालयातील गुणी मुलांना पदवी हातात पडण्याअगोदरच नोकरीच्या नियुक्तीचे पत्र मिळाले हे याचे वेगळेपण.

 गणेशोत्सवात 'या' चार दिवशी ध्वनीवर्धक रात्री बारापर्यंत सुरू राहणार; पुणे पोलिसांनी केले जाहीर!​

इन्फोसिस, टीसीएस, अटॉस सिन्टेल, भारत फोर्ज आणि कल्याणी टेक्नोफोर्ज, ऍक्सेंचर, कॉग्निझंट, टाटा टेक्नॉलॉजिज, अँम्डॉक्स, विप्रो, कॅपजेमिनी, राजा सॉफ्टवेअर लॅब्स, एल अँड टी इन्फोटेक, फिसर्व, केपीआयटी, केएसबी पंप्स, आईबीएम या सारख्या कंपन्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुलांना नोकरीची संधी दिली आहे. अडोब, बायजूस, अपग्रॅड व टॉपर या कंपन्यांनीही मुलांना रोजगार मिळवून दिला.   
महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध टेक्निकल, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रॅम्स आयोजित केले जातात, हे ट्रेनिंग प्रोग्रॅम्स घेण्यासाठी कॉलेजमधील तज्ज्ञ शिक्षक आणि इंडस्ट्री मधील तज्ज्ञांची मदत घेतली जाते. 

Big Breaking : पुण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा उच्चांक; एकाच दिवसात 'इतक्या' रुग्णांचा मृत्यू      

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट विद्यार्थ्यांना प्रत्येक कॅम्पस ड्राईव्हच्या आधी मागदर्शन करते, यात कंपनीची निवड प्रक्रिया, घेण्यात येणारे राऊंड्स, इंटरव्ह्यू प्रोसेसची माहिती देण्यात येते, तसेच विद्यार्थ्यांकडून इंटरव्ह्यूसाठी विशेष तयारी करून घेण्यात येते. विद्यार्थी व महाविद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाल्याचे प्राचार्य डॉ. बिचकर यांनी सांगितले.