पुणे जिल्ह्यात यंदा 672 सार्वजनिक शौचालये युनिट उभारण्यात येणार

Pune-Public-Toilet
Pune-Public-Toilet

पुणे - जिल्ह्यातील आठवडी बाजार, तीर्थक्षेत्र. पर्यटनस्थळ, पालखी मार्ग आणि लोकवर्दळ असणाऱ्या गावांमध्ये किमान प्रत्येकी एक सार्वजनिक शौचालये युनिट उभारण्यात येणार आहे. यासाठी आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 672 गावांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केले आहेत. या गावांना शौचालय उभारणीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यानुसार पहिल्या टप्प्यात आंबेगाव, भोर, हवेली, इंदापूर, जुन्नर, मावळ, मुळशी आणि वेल्हे या आठ तालुक्‍यातील 40 गावांना प्रत्येकी दोन लाख रुपयांप्रमाणे 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उर्वरित गावांना टप्प्याटप्याने हा निधी दिला जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.

केंद्र पुरस्कृत संपूर्ण अभियानांतर्गत (पूर्वाश्रमीचे निर्मल भारत अभियान) याबाबतचा पुणे जिल्ह्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक युनिटसाठीच्या दोन लाख रुपयांपैकी केंद्र सरकार 60 टक्के, राज्य सरकार तीस टक्के आणि ग्रामपंचायतींचा 10 टक्के हिस्सा, याप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो.

सार्वजनिक शौचालये युनिट मंजूर करण्यात आलेली तालुकानिहाय गावे
पुढीलप्रमाणे -

आंबेगाव - कुरवंडी गावठाण. भोर - हातवे खुर्द (भैरवनाथ मंदिर), ससेवाडी (विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर), आंबवडे (जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा). इंदापूर - सपकाळवाडी (दोन युनिट), गोतोंडी, रुई. हवेली - लोणी काळभोर (दोन युनिट), नायगाव, औताडे-हांडेवाडी (दोन युनिट). जुन्नर - ओझर नंबर 2 (तीन युनिट), बोरी बुद्रूक, पारगाव तर्फे आळे (दोन युनिट), वारूळवाडी (चार युनिट), नारायणगाव (पाच युनिट), पिंपरी कावळ, गुंजाळवाडी बेल्हे, रानमळा, नळावणे (दोन युनिट), ओतूर (दोन युनिट). मावळ - कुसगाव खुर्द (दोन युनिट). मुळशी - चांदे, रिहे, पौड. वेल्हे - धानेप.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com