बाजारात खळबळ माजवणाऱ्या स्टार्टअपची निर्मिती झालीच नाही; अभ्यासातून पुढे आली माहिती

Start_Up
Start_Up

पुणे : एखाद्या समस्येवर उपाय ठरणारे उत्पादन आधीच बाजारात उपलब्ध असले तर तेथील संधी संपत नाहीत, हे अनेक स्टार्टअपने दाखवून दिले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या   उत्पादनापेक्षा हटके आणि प्रभावी उत्पादन बनवून स्टार्टअप यशस्वी होत आहेत. नवउद्योजकांच्या उत्पादनाचा विचार करता ६८ टक्के स्टार्टअपचा जोर आहे त्याच वस्तूत काही तरी नवीन शोध लावून किंवा उपलब्ध माहिती वापरून आपली वस्तू बाजारात उपलब्ध करण्यावर असल्याचे समोर आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्राइज' (सीआयआयइ) विभागाने याबाबत अभ्यास केला आहे. स्टार्टअपच्या उत्पादनामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खळबळ माजवली नसल्याचे देखील अनेकांनी मान्य केले आहे. तसेच एखादी वस्तू तयार करत असताना ग्राहकांचा विचार केला जातो. मात्र त्याचे विचार ती वस्तू बनवताना घेतला जात नाही. त्यामुळे वस्तू प्रत्यक्षात जेव्हा बाजारपेठेत जाते तेव्हा त्याला त्वरित अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ग्राहकांनी त्यात सुचवलेले बदल, सर्वात प्रथम आपली वस्तू कोण विकत घेत आहे, या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर संबंधित वस्तूत आवश्यक ते बदल करून पुन्हा उपलब्ध करून दिली जात असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

उत्पादनाचा ग्राहकांना फायदा झाल्याचा विश्वास :
उत्पादन पूर्णतः नवीन नसले तरी त्याचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे स्टार्टअप सांगतात. याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर ५८ टक्के होकारार्थी उत्तर आले आहे. तर २० टक्के स्टार्टअपने ग्राहकाला फायदा मिळाले नसल्याचे सांगितले.

आपली वस्तू फारच कमाल असून बाजारात त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा अनेक स्टार्टअप बाळगून असतात. मात्र बऱ्याचदा प्रत्यक्षात तसे होत नाही. सुरुवातीला तुमचे उत्पादन कोणी विकत घेतले? त्यातून त्याचे समाधान झाले का? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यावर त्या उत्पादनाचे यश अवलंबून असते. त्यामुळे बाजारात प्रभाव असणाऱ्या ग्राहकोपयोगी गोष्टी शोधून काढणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका, सीआयआयइ 

उत्पादन तयार करताना तुम्ही वापरलेली माहिती ही नवीन असल्याचे मान्य आहे का?
पूर्णतः मान्य - 5 %
मान्य - 5%
काही प्रमाणात मान्य - 5 % 
तटस्थ - 17 %
काही प्रमाणात अमान्य - 34 % 
अमान्य - 12 % 
पूर्ण अमान्य - 22%

तुमच्या उत्पादनामुळे ग्राहकांना अनोखे फायदे झाल्याचे तुम्हाला मान्य आहे का?
पूर्णतः मान्य - 39 %
मान्य - 17 %
काही प्रमाणात मान्य - 2 % 
तटस्थ - 5 %
काही प्रमाणात अमान्य - 5 % 
अमान्य - 12 % 
पूर्ण अमान्य - 20%

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com