पुण्यातील ७५ वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्याने कोरोनाला हरविले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

घरी आल्यावर त्यांचे टाळ्या वाजवून तसेच दिवे लावून सोसायटीच्या व्यवस्थापन सदस्यांनी जंगी स्वागत केले.

une-news">पुणे): बी. टी. कवडे रस्ता येथे राहणाऱ्या एका ७५ वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्याने कोरोनाला हरवले आहे. ९ मे रोजी ताप व इतर काही त्रास होत असल्यामुळे त्यांना कमांड हॉस्पिटल मध्ये नेले असताना त्यांची कोरोना चाचणी केली. १० तारखेला कोरोना चाचणी सकारात्मक आली तसेच न्यूमोनिया झाल्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. अखेर  कोरोनावर मात करत आज ते दहा दिवसांनी घरी आले आहेत.

हातावरचे पोट असलेल्यांचा संसार येणार रूळावर 

घरी आल्यावर त्यांचे टाळ्या वाजवून तसेच दिवे लावून सोसायटीच्या व्यवस्थापन सदस्यांनी जंगी स्वागत केले. याचे नियोजन सोसायटीच्या अध्यक्षा रुपाली कवडे व इतर सदस्यांनी केले होते. लष्करात मराठा बटालियन मध्ये ले. कर्नल पदावर त्यांनी २२ वर्ष देश सेवा केली आहे.

दोन महिन्यांनंतर पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर दागिन्यांची झळाळी

निवृत्ती घेतल्यानंतर गेल्या १५ वर्षांपासून ते बी. टी.कवडे रस्त्यावर राहतात. लष्करी शिस्त अंगी  असल्यामुळे कर्नल स्वतः लॉकडाउनच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत होते. परंतु तरीही अचानक कोरोना झाल्यामुळे कुटुंबातील सर्वजण चिंतेत होते.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

घरातील इतर पाच लोकांची चाचणी केली. दुसऱ्या दिवशी सर्वांची चाचणी नकारात्मक आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला. या लष्करी अधिकाऱ्याने इच्छाशक्ती आणि योग्य वैद्यकीय उपचार यामुळे कोरोनाची लढाई यशस्वीरित्या पार पाडली. सीमेवरची लढाई असो किंवा कोरोनाची त्यांनी या वयात सहजरित्या मात केल्याने त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 75 years old ex- army man fight with corona