Pune : भाजेकर पॅव्हेलियन ते डेक्कन पोलिस ठाणे ९९ वर्षांचा प्रवास

तो ब्रिटिशांचा काळ.... साहजिकच क्रिकेटचा प्रसार व्हायला लागलेला.... १९०६ मध्ये स्थापन झालेला डेक्कन जिमखाना क्लबही यात मागं राहणं शक्य नव्हतं....
भाजेकर पॅव्हेलियन ते डेक्कन पोलिस ठाणे ९९ वर्षांचा प्रवास
भाजेकर पॅव्हेलियन ते डेक्कन पोलिस ठाणे ९९ वर्षांचा प्रवास sakal news

तो ब्रिटिशांचा काळ.... साहजिकच क्रिकेटचा प्रसार व्हायला लागलेला.... १९०६ मध्ये स्थापन झालेला डेक्कन जिमखाना क्लबही यात मागं राहणं शक्य नव्हतं.... जिमखान्यावर क्रिकेट सुरू झालं आणि वेगवेगळे सामने व्हायला लागले... त्यासाठी आवश्यक होतं पॅव्हेलियन...

जिमखान्याच्या तेव्हाच्या मैदानाशेजारीच असलेल्या प्लाॅटवर पॅव्हेलियन बांधलं..... इंग्लंडमधल्या क्रिकेट पॅव्हेलियनची शान या पॅव्हेलियनलाही होती.... इमारतीच्या दोन बाजूला पाहुणा संघ आणि यजमान संघाच्या खोल्या, मधल्या भागात स्कोअरर्स बसण्याची व्यवस्था.... पॅव्हेलियनमधून पीचवर जाण्यासाठी पायऱ्या असा सगळा थाट होता....या पॅव्हेलियनला नाव दिलं गेलं एल. आर. भाजेकर यांचं...भाजेकर १९०८ ते १९११ या काळात डेक्कन जिमखान्याचे पहिले जनरल सेक्रेटरी होते. ही वास्तू बांधण्यासाठी टिळक तलावाच्या जागी असलेल्या दगडाच्या खाणीतल्या दगडांचा वापर केला गेला. ३० सप्टेंबर, १९२२ रोजी या पॅव्हेलियनचे उद्‍घाटन झाले.

त्यावेळी जिमखाना परिसर हा शहराच्या बाहेरचा परिसर म्हणून गणला जायचा... इथल्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या मुला-मुलींसाठी शाळा हवी या हेतूनं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीनं डेक्कन जिमखान्याकडं जागा मागितली.... जिमखान्याच्या तेव्हाच्या पदाधिकाऱ्यांनी या भाजेकर पॅव्हेलियनची काही जागा शाळेसाठी दिली... २२ आॅक्टोबर, १९२२ पासून या वास्तूत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र प्राथमिक शाळेचे वर्ग भरायला सुरुवात झाली. त्यावेळी चार वर्ग सुरू करण्यात आले...

भाजेकर पॅव्हेलियन ते डेक्कन पोलिस ठाणे ९९ वर्षांचा प्रवास
Beed : सात दिवसांत सात बळी

पुढे शाळा आपल्या स्वतःच्या वास्तूत गेली आणि भाजेकर पॅव्हेलियन पुन्हा मोकळं झालं.... दरम्यानच्या काळात दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटिशांनी या जागेत रेशनिंगचं आॅफिस सुरू केलं.....नंतरच्या काही वर्षांत या वास्तूत आयुर्वेद रसशाळेचा औषधांचा कारखानाही काही काळ चालला.....

जिमखान्यावरची वस्ती वाढायला लागली तशी या भागात पोलीस चौकी असावी ही गरज निर्माण झाली.....सुरुवातीच्या काळात डेक्कन पोलीस ठाणं सध्याच्या गरवारे पुलाच्या शेजारी असलेल्या बंगल्यात होतं असं जुने लोक सांगतात... पुढे पोलिसांना ही जागा कमी पडायला लागली....त्यावेळी जागेच्या शोधात असलेल्या पोलिसांनी निवड केली ती याच भाजेकर पॅव्हेलियनची.

तेव्हापासून आजपर्यंत या वास्तूत डेक्कन पोलीस ठाणे आहे. एकेकाळी खेळाडू पाहिलेल्या या वास्तूनं खतरनाक गुन्हेगारही पाहिले.....

भाजेकर पॅव्हेलियन ते डेक्कन पोलिस ठाणे ९९ वर्षांचा प्रवास
UNGA : अण्वस्त्रमुक्तीसाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे

डेक्कन जिमखान्याने १५ मार्च १९६४ रोजी सर्वसाधारण सभेत लाॅकअप बांधून देण्याचा ठराव संमत केला आणि २५ हजार रुपये खर्चून इथलं लाॅकअप बांधून दिलं. त्या पूर्वी या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी राहत होते. हेडकाँन्स्टेबल दळवी हे या वास्तूत निवासास असलेले शेवटचे पोलीस कर्मचारी होते असं डेक्कन जिमखान्याकडील रेकाॅर्डवरुन दिसतं.

१९६१ मध्ये पुण्यात पानशेत धरण फुटलं त्यावेळी या वास्तूच्या छपरापर्यंत पाणी पोहोचलं होतं....त्यावेळी पोलीस ठाण्याची स्टेशन डायरी वाचवण्यासाठी तेव्हाचे ठाणे अंमलदार ती घेऊन छपरावर चढून बसले होते असं सांगितलं जातं. एकूणच ही जागा वैशिष्ट्यपूर्ण आहे हे नक्की.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com