NCP : सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली; निकवर्तीय सचिन दोडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

NCP : सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली; निकवर्तीय सचिन दोडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

पुण्यात राष्ट्रवादी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (A case was registered against NCP corporator Sachin Dodke )

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोडके यांच्यासह ५-६ कार्यकर्त्यांवर मारहाण तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

वारजे पोलिस ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते वासुदेव भोसले यांनी फिर्याद दिली आहे. या पार्श्वभूमीवर दोडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सचिन दोडेक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्ष दोडेक पुणे शहरातील वारजे भागात नगरसेवक आहेत.

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता वारजे भागात असलेल्या आर एम डी कॉलेज ते साई सयाजी नगर येथे एक अंडरपस (बोगदा) आहे.

त्या ठिकाणी खडकवासला लोकसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काही काम चालू असलेल्या ठिकाणी सचिन दोडके, संजय दोडके आणि त्यांचे इतर कार्यकर्ते पोहचले.

त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि यातच संजय दोडके यांनी हातात बांबू घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. तिथे सुरू असलेल्या कामगारांना सुद्धा मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे.