Leopard Death News : पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील मुकाई मळा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
Leopard Death News
Leopard Death Newssakal

वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील मुकाई मळा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की पुणे - नाशिक महामार्गावरील आळेफाटा बायपास रस्त्यातील मूकाई मळा येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट मृत्यू झाल्याची घटना घडली.

सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे आळे वनपाल संतोष साळुंके, वनमजूर वी.के. खर्गे, रेस्क्यू टीमचे बाबाजी खरगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ओतूर वर परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वाहनातून सदर बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आले आहे.

Leopard Death News
Pune Loksabha Ravindra Dhangekar यांना उमेदवारी घोषित, Aba Bagul नाराज थेट पक्षश्रेष्ठींना सवाल

दरम्यान तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे बिबटे सध्या सैरभर झाले असून नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. पाणी तसेच खाद्याच्या शोधात हे बिबटे रात्री अपरात्री फिरत असतात. रस्ता क्रॉस करताना अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com