esakal | कोरोना टेस्टिंग किटचा तुटवडा इतिहासजमा; अभिजित पवार, अदार पुनावालांचा मायलॅबशी करार

बोलून बातमी शोधा

abhijeet pawar adar poonawalla partnership with mylab company which made covid19 test kits

अभिजीत पवार म्हणाले, 'या कठीण प्रसंगात देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले सरकार यांच्यासोबत उभं राहणं ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे.'

कोरोना टेस्टिंग किटचा तुटवडा इतिहासजमा; अभिजित पवार, अदार पुनावालांचा मायलॅबशी करार
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे Fight with Coronavirus : देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या अचूक निदानासाठी पुण्याने आता आघाडी घेतली आहे. कोरोनाच्या उद्रेकातून देशावर ओढवलेल्या संकटात नागरिकांचे सामाजिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पुण्यातील तीन दिग्गज संस्था एकत्र आल्या आहेत. त्यात कोरोना निदानाची देशातील पहिले किट तयार करणारी ‘मायलॅब’ फार्मास्युटिकल्स कंपनी, जगातील १७०हून अधिक देशांमध्ये लसीचा पुरवठा करणारी ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एसआयआय) आणि ‘एपी ग्लोबाले’ या संस्था समाजकार्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात कोरोना विषाणूंचा फैलाव वेगाने होत आहे. त्यात सुरुवातीला परदेशातून प्रवास करून आलेल्या किंवा कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती यांचीच फक्त वैद्यकीय चाचणी केली जात होती. कारण, या कोरोना तपासण्याच्या किट आयात कराव्या लागत होत्या. कोरोना निदान किट आता पुण्यातील ‘मायलॅब’ कंपनीने विकसित केले आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी करणे या किटमुळे शक्‍य होणार आहे. किटचे उत्पादन वाढविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ‘मायलॅब’चे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ यांच्याबरोबर ‘एसआयाय’चे आदर पूनावाला, ‘एपी ग्लोबाले’ आणि ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार हे यांनी योगदान दिले आहे. 


‘‘कोरोना किटची गुणवत्ता सर्वोत्तम राखणे, हे यातील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यासाठी जगातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये लस वितरित करणाऱ्या ‘एसआयआय’ पेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. तसेच, या किटच्या उत्पादनासाठी निधी उभारणे, मार्गदर्शन हे देखील महत्त्वाचे आहे. तसेच या तिन्ही संस्थांना एकत्र आणण्यासाठी पवार यांचे योगदान मोलाचे आहे,’’ असे रावळ यांनी स्पष्ट केले. ‘‘कोरोनाच्या किटची देशातील गरज पूर्ण करणे, याला प्राधान्य आहे. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला २० लाख युनिट्‌स उत्पादन करण्यापर्यंत क्षमता वाढवत आहोत. देशात रोगनिदानासाठी किटची कमतरता भासणार नाही,’’ असेही रावळ यांनी सांगितले. 

आणखी वाचा - वाचा महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची स्थिती

एकत्र आल्याने काय होणार? 
देशातील कोरोनाचा संशय असलेल्या प्रत्येक रुग्णाची तपासणी झाली पाहिजे. त्यासाठी हे कीट लवकरात लवकर प्रयोगशाळांपर्यंत पोहोचले पाहिजे, तेही कमी किमतीत. या तिन्ही संस्था एकत्र येण्यामागचा हा उद्देश आहे. 

मायलॅब 
कोरोनाचे निदान करणारे किट तयार करणारी मायलॅब ही देशातील पहिली कंपनी ठरली. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सोप्या पद्धतीने अचूक रोगनिदान करणे, तेही अत्यंत कमी खर्चात उपलब्ध करणे, हा ‘मायलॅब’चा उद्देश आहे. रुग्णाच्या नमुन्यातून त्याचे रोगनिदान करणारी यंत्रणा प्रयोगशाळेत विकसित करण्यावर भर दिला आहे. रोगनिदान, औषधनिर्माण आणि विकास, जैववैद्यकीय संशोधन, अन्न सुरक्षा ॲग्री जीनोमिक्‍स अशा विविध ठिकणी कंपनी योगदान देत आहे. या प्रक्रिया जलद होतील आणि त्रुटी कमी असतील, या दृष्टीने कंपनी प्रयत्न करत आहे. 

आणखी वाचा - अमेरिकेसाठी 9/11पेक्षा कोरोना घातक

आदर पूनावाला 
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदर पूनावाला हे भारतातील अग्रगण्य उद्योजक आहेत. ‘आदर पूनावाला क्‍लीन सिटी’ यासह अनेक सामाजिक प्रकल्पांमध्ये त्यांचा पुढाकार आणि ‘आदर पूनावाला महाराष्ट्र टेनिस ॲकॅडमी’, पूनावाला फाउंडेशन, आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता आणि पर्यावरण यांत त्यांचे योगदान आहे. 

आणखी वाचा - कच्चे तेल झाले पाण्या पेक्षा स्वस्त, दर वाचून आश्चर्य वाटेल!

'एपीजी'विषयी थोडे
एपी ग्लोबाले, एक सकारात्मक ‘इम्पॅक्‍ट बिझिनेस सोल्यूशन्स कंपनी’ आहे. ‘सकाळ’च्या माध्यमातून ‘मायलॅब’ ही देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर कोरोना किट प्रयोगशाळांपर्यंत पोचविण्यात मदत करणार आहे.