Corona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 519 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 6 हजार 999 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत.

पुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 1 लाख 60 हजार 832 जण आहेत. दरम्यान, बुधवारी (ता.२) जिल्ह्यात 913 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 347 जण आहेत.

...फक्त लग्न मोडले म्हणून!​

गेल्या 24 तासांत 10 हजार 898 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. याशिवाय 970 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी दिवसभरातील नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अन्य 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद
कार्यक्षेत्रातील प्रत्येकी 4 जणांचा समावेश आहे. कॅंन्टोन्मेंट बोर्ड
क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री

दिवसभरातील रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 371 रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये 223, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 266, नगरपालिका कार्यक्षेत्रात 74 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 519 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 6 हजार 999 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 8 हजार 431 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 405 रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.1) रात्री आठ वाजल्यापासून बुधवारी (ता.2) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

चारित्र्यावर संशय घेत पती करायचा मारहाण; डॉक्‍टर महिलेनं संपवलं जीवन​

संस्थानिहाय कोरोनामुक्त रुग्णांची संख्या
- पुणे महापालिका (शहर) - 1 लाख 60 हजार 832.
- पिंपरी चिंचवड - 88 हजार 972.
- जिल्हा परिषद कार्यक्षेत्र - 53 हजार 659.
- नगरपालिका (14 मिळून) - 15 हजार 598.
- कॅंटोन्मेंट बोर्ड (3 मिळून) - 5 हजार 897

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About 3 lakh and 25 thousand patients in Pune district have overcome corona