नातेवाईकांच्या मदतीने आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

पोलिसांनी आरोपी नदीम याला एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी पिंपरी पोलिस ठाण्यातील हवालदार तोडमल, आदवडे व झगडे हे तिघेजण आरोपीला घेवून बुधवारी (ता.5) दुपारी दीडच्या सुमारास पिंपरीतील शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात आले होते.​

पिंपरी : एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला तपासासाठी घटनास्थळी आणले असता त्याठिकाणी नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांशी हुज्जत घालत आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. ही घटना पिंपरीतील शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात घडली.
 

une/girl-threatened-acid-attack-pimpri-259388">धक्कादायक! तरुणीच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड करून ऍसिड हल्ल्याची धमकी

नदीम गफूर शेख (वय 19) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सहारा नदीम शेख (वय 19), गफूर जावेद शेख (वय 32, सर्व रा. रिव्हर रोड, पिंपरी), आरोपीची मामेबहीण सुषमा राजू परदेशी (वय 18, रा. शेवाळे सेंटर कंपनी आवार, पिंपरी) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार संजय तोडमल यांनी फिर्याद दिली आहे.

तुझे लग्न झालेले आहे, तरीही आपण...

पोलिसांनी आरोपी नदीम याला एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी पिंपरी पोलिस ठाण्यातील हवालदार तोडमल, आदवडे व झगडे हे तिघेजण आरोपीला घेवून बुधवारी (ता.5) दुपारी दीडच्या सुमारास पिंपरीतील शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात आले होते. त्यावेळी आरोपीचे नातेवाईक तेथे आले. त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. या गोंधळाचा फायदा घेवून आरोपी नदीम पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी नदीसमह त्याच्या नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absconding the accused with the help of relatives In pimpri