Pune Accident | पुणे: मुलीला शाळेला सोडायला जाताना ट्रकची धडक; बाप-लेकीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car and Bike Accident
पुणे: मुलीला शाळेला सोडायला जाताना ट्रकची धडक; बाप-लेकीचा मृत्यू

पुणे: मुलीला शाळेला सोडायला जाताना ट्रकची धडक; बाप-लेकीचा मृत्यू

पुण्यातील सासवड रस्त्यावर झालेल्या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे. वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून मुलीला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. (Road Accident in Pune)

हेही वाचा: अमरावती - परतवाडा-बैतुल मार्गावर भीषण अपघात, ६ जण जागीच मृत्यू

मुलीला शाळेत सोडविण्यासाठी जात असताना त्यांना ट्रकची (Truck Accident) धडक बसली. या धडकेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला. मुलीला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटर समोर सातववाडी या ठिकाणी झाला.

हेही वाचा: Bus Accident : इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू

नीलेश साळुंखे (वय ३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) मीनाक्षी साळुंखे (वय १०) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मीनाक्षी ही साधना विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. या प्रकरणी ट्रक (MH46AR5181) चालक दिलीप कुमार पटेल (रेवा, मध्य प्रदेश) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Accident Near Saswad In Pune On Road While Going To School

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top