अभियंत्यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी पदपथ बांधणाऱ्या कंपनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

Accidental death of an engineer case FIR filed against the company manager who built the sidewalk
Accidental death of an engineer case FIR filed against the company manager who built the sidewalk

पुणे : "स्मार्ट सिटी'साठी प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावरील पदपथाच्या ठिकाणी अर्धवट खड्डा ठेवून दुचाकीवरून जाणाऱ्या दोन संगणक अभियंत्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 8 नोव्हेंबर रोजी बाणेर रस्त्यावरील वेस्ट साईड मॉलच्या समोरील रस्त्यावर हा अपघात झाला होता. त्यामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. 

Diwali Festival 2020 : वसुबारस : पहिला दिवा आज लागणार दारी​

जे.पी.एंटरप्रायझेस इंजिनिअर्स ऍण्ड कॉन्ट्रॅक्‍टर्स या कंपनीचा व्यवस्थापक नितीन बाबूलाल शहा (वय 56, रा. स्वारगेट) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक दीपक फसाळे यांनी फिर्याद दिली होती. देवाशिष विद्यानंद सक्‍सेना (वय 24 रा. मेट्रो झास, म्हाळुंगे, मुळ रा.भोपाळ), तेजस त्रिदेव शर्मा (वय 24, रा. मेट्रो झास, म्हाळुंगे, मुळ रा. जयपुर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. 

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश माळेगावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रस्त्यावरील गणराज चौक ते राधा चौक या दरम्यान स्मार्ट सिटीअंतर्गत पदपथाचे काम सुरू आहे. संबंधित काम जे.पी.एंटरप्रायझेस इंजिनिअर्स ऍण्ड कॉन्ट्रॅक्‍टर्स या कंपनीकडून सुरू आहे. असे असताना तेथे तीन फूट खोल अर्धवट खड्डा करण्यात आला होता. त्या खड्ड्याभोवती सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्‍यक बॅरीकेटींग, दिशादर्शक फलक, इंडिकेटर लावण्यात आले नव्हते. तसेच संबंधित ठिकाणी कंत्राटदार कंपनीने वॉर्डनचीही नेमणूक केली नव्हती. वाहतूक शाखेकडूनही त्यांना कामासाठी परवानगी देताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्‍यक काळजी घेण्यासाठी नियम व अटी ठेवण्यात आल्या होत्या. त्या नियमांचे उल्लंघन करून, अर्धवट खड्ड्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षिततेच्यादृष्टीने साधने लावली नव्हती. 

दरम्यान, आयटी कंपनीमध्ये काम करणारे देवाशिष व तेजस हे दोघेही संगणक अभियंते त्यांच्या दुचाकीवरून रविवारी 8 नोव्हेंबरला रात्री साडे बारा वाजता पुणे विद्यापीठाकडून म्हाळुंगेच्या दिशेने जात होते. त्यावेळी पदपथावरील खड्ड्यामध्ये त्यांची दुचाकी गेली. त्यामुळे झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चतुःश्रृंगी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये जे.पी.एंटरप्रायझेस इंजिनिअर्स ऍण्ड कॉन्ट्रॅक्‍टर्स या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे दोन संगणक अभियंत्यांना आपला जीव गमवावा लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा : जाणून घ्या, पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com