विद्यार्थ्यांनो, MHT-CET परीक्षेच्या तारखा जानेवारीत होणार जाहीर!

Students_CET
Students_CET

पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जईई मेन्स परीक्षेची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र सीईटी सेल कडून 'एमएचटी-सीईटी' परीक्षेच्या तारखांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात 'सीईटी सेल'चे नियोजन सुरू असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडून गेले आहे, त्याचा परिणाम इयत्ता 12वी नंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी असलेल्या परीक्षांच्या नियोजनावर झाला आहे. 'एनटीए'ने जेईई मेन्स परीक्षा दोन वेळा घेण्याऐवजी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यात चार वेळा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीही वेळ मिळणार आहे. 'एनटीए'ने हे नियोजन केलेले असताना सीईटी सेलने अद्याप इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी पदवीच्या प्रवेशासाठीच्या परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच पदवी व पदव्युत्तर पदवीच्या सुमारे 15 अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे नियोजन सीईटी सेलकडून केले जाते.

महाराष्ट्रात दरवर्षी 'एमएचटी-सीईटी' परीक्षेसाठी चार लाखापेक्षा जास्त विद्यार्थी नोंदणी करतात. यंदा महाविद्यालये व खासगी क्‍लासेस ऑनलाइनच सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित अभ्यास करून परीक्षांमध्ये चांगला रॅंक मिळविण्याचे आव्हान आहे. त्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक ही लवकर जाहीर व्हावे अशी अपेक्षा आहे.

सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी म्हणाले, "जेईई आणि सीईटी यांच्या परीक्षांच्या तारखा एकाच वेळी येऊ नयेत यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. सीईटी परीक्षा एक किंवा त्यापेक्षा जास्त वेळा होईल का हे आताच सांगणे शक्‍य नाही, त्याच्या तांत्रीकतेवर चर्चा सुरू आहे. सध्या परीक्षेसाठी प्रश्‍न काढणे आणि इतर गोष्टींची तयारी सुरू आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षेच्या तारखांची घोषणा होऊ शकेल.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com