esakal | अचूकता व तत्परता ही एव्हिएशन क्षेत्रात महत्वाची बाब : डॉ. नितीन करमळकर
sakal

बोलून बातमी शोधा

pune

अचूकता व तत्परता ही एव्हिएशन क्षेत्रात महत्वाची बाब : डॉ. नितीन करमळकर

sakal_logo
By
किशोर गरड

आंबेगाव बुद्रुक : एव्हिएशन क्षेत्रात अचूकता व तत्परतेला खुप महत्व आहे. हे क्षेत्र नेहमी प्रगती करते आहे. शिवाय,भविष्यात एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनिअर्स ची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून योग्य ते कौशल्य प्राप्त केले पाहिजे.असे प्रतिपादन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पुणे इन्स्टिटयूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी संस्थेतील एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीरिंग पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभा वेळी केले.

हेही वाचा: मृत्यूसंदर्भातील सिद्धार्थचं 'ते' जुनं ट्विट पुन्हा व्हायरल

आंबेगाव बुद्रुक येथील पुणे इन्स्टिटयूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी संस्थेतील एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीरिंग पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे उपस्थित होते. दरम्यान, पुणे इन्स्टिटयूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी संस्थेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बी.एस्सी.(Bsc)या अभ्याक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण तसेच नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. असेही डॉ. करमळकर म्हणाले.मार्गदर्शनपर भाषणात विमान प्रवासातील गंमतीदार किस्साही करमळकर यांनी सांगितला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक संचालक भारत पाटील यांनी केले. साधारण चार बॅच संस्थेतून एव्हिएशनचे शिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत.पैकी ८० टक्के विद्यार्थी हे या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत.

हेही वाचा: राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करा : शिवसंग्राम

कार्यक्रमास,प्राचार्य एअर कमोडोर जगदीश वाणी, राकेशकुमार श्रीवास्तव, शास्वत रंजन, विलास गव्हाणे,संतोष पाटील यांचेसह विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोविड काळात विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पश्चिम भारतातील मान्यता प्राप्त सर्वोत्कृष्ट वैमानिक अभियंता तांत्रिक (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन इंडिया) प्रशिक्षण देणारी आपली संस्था आहे. बी.एस्सी. एव्हिएशन आणि एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियरिंग पदवी देणारी महाराष्ट्रतील अग्रगण्य संस्था आहे.

- भारत पाटील, संस्थापक संचालक, पुणे इन्स्टिटयूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी.

loading image
go to top