सीसीझेडएमचे दुरस्त नकाशे हवाई दलाच्या वेबसाईटवरून गायब! पुणे महापालिका गोंधळात

Accurate CCZM maps disappear from the Air Force website
Accurate CCZM maps disappear from the Air Force website

पुणे : बांधकामांना परवानगी देताना समुद्र सपाटीपासूनच्या उंची ठरवून देण्याबतच्या नकाशांमध्ये झालेली चुक दुरूस्त करून देण्याबाबतची विनंती पुणे महापालिकेने हवाई दलाला केली खरी. ती मान्य करीत हवाई दलाने दुरूस्ती करून ते नकाशे संकेतस्थळावर टाकले देखील. परंतु ते दुरूस्त नकाशे हवाई दलाच्या संकेतस्थळावरून गायब झाले असल्याचे समोर आले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहराच्या हद्दीत नकाशे मंजूर करताना समुद्र सपाटीपासून जमिनीच्या उंचीबाबतचे प्रमाणपत्र हवाई दलाकडून घेणे स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य सरकारने बंधनकारक केले. त्यानुसार हवाई दलाने विमानतळ आणि परिसरात कशा प्रकारे परवानगी द्यावी, यासंदर्भातील "कलर कोडेड झोनिंग'चे नकाशे (सीसीझेडएम) तयार करून एप्रिल 2018 मध्ये महापालिकेस पाठविले होते. हवाई दलाने महापालिकेला पाठविलेल्या या "सीसीझेडएम' नकाशांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले होते. परिणामी पुणे शहरातील शेकडो बांधकामे अडचणीत आली होती. 

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

या नकाशावरून निर्माण झालेल्या गोंधळाबाबत हवाई दल आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या दोन ते तीन वेळा एकत्रित बैठका झाल्या. या बैठकांमध्ये महापालिकेने "सीसीझेडएम" नकाशांमध्ये झालेल्या चुका हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्या चुका मान्य करीत नकाशे दुरुस्त करण्यास हवाई दलाने मान्यता दिली होती. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात दुरूस्त नकाशे हवाई दलाकडून त्यांच्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आले. परंतु सुधारीत नकाशांसंदर्भात कोणतीही अधिसूचना प्रसिद्ध केली नाही. अचानक हे नकाशे संकेतस्थळावरून गायब झाले आहेत. त्यामुळे महापालिकेपुढे प्रश्‍न निर्माण झाला आहे. बांधकाम आराखडा तयार करताना सुधारीत नकाशानुसार कि, जुन्या नकशांनुसार करावे, या गोंधळात महापालिका पडल्याने त्याचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसत आहे. 

'आयबीपीएस' परीक्षेला महाराष्ट्रातील विद्यार्थी मुकणार ? 
  
"सीसीझेडएम'चे दुरूस्त नकाशे हवाई दलाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु ते नंतर पुन्हा संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आले आहे. या संदर्भात माहिती घेतल्यानंतर नकाशे मान्यतेच्या प्रक्रियेत असताना चुकून ते संकेतस्थळावर टाकण्यात आले होते. त्यामुळे ते काढून घेण्यात आले असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या बोलीवर सांगितले. 

"सीसीझेडएम'चे दुरूस्त नकाशे हवाई दलाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. आता मात्र ते त्या संकेतस्थळावर दिसत नाहीत. जुनेच नकाशे दिसत आहेत. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने दुरस्त नकाशे संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरीकांना दिलासा द्यावा 
- सुधीर कुलकर्णी ( अध्यक्ष, नागरी हक्क संस्था)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com