कॅबचालकाचे अपहरण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस पाच वर्षांनी अटक

 accused arrested after Five Years for abducting cab driver and forcibly stealing
accused arrested after Five Years for abducting cab driver and forcibly stealing

पुणे : कॅब चालकाचे अपहरण करुन त्यास चाकूचा धाक दाखवून कार पळवून नेण्याच्या प्रकरणातील एका आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी तब्बल पाच वर्षांनी अटक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध जणांविरुद्ध अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

महाशिवआघाडी झाली तरीही पुण्यात भाजपचेच वर्चस्व

देविदास सरगर (रा. 31, रा. कुडुस, माळशिरस,सोलापुर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हिरामन शंकर हरिजन (वय 27, रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी, मुळ रा.सीदंगी, विजापुर, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली होती.

धक्कादायक! पिंपरीत तरुणीवर बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खासगी कॅबवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. पाच वर्षांपूर्वी एका प्रवाशाने त्यांना गणपतीमुळे मार्गे ताम्हिणी घाटामध्ये जाण्यासाठी फिर्यादी यांची गाडी ऑनलाईन बुकींग केली. फिर्यादी त्यांना घेण्यासाठी कात्रज येथील वंडरसिटी येथे गेले. प्रवाशी व त्याच्या साथीदारांना घेऊन ते काही अंतरावर गेले. त्यावेळी देवीदास हनुमंत सरगर, राहूल अप्पासाहेब रुपनवर, सागर अडागळे या तिघांनी गाडी थांबविण्यास सांगून त्यांना चाकूचा धाक दाखवित त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांची स्विफ्ट कार जबरदस्तीने चोरुन घेऊन गेले होते. यामधील रुपनवर यास पोलिसांनी अटक केली. मात्र उर्वरीत आरोपी फरारी होते. त्यापैकी सरगर हा कर्जत येथील न्यायालयात येणार असल्याची खबर पोलिस कर्मचारी गणेश चिंचकर, महेश मंडलिक यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी सरगर यास सापळा रचून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

पुणेकरांनो चला! हिंजवडीपासून 45 मिनिटांवर आहे स्वर्ग...

अटक आरोपी भोरमधील मुळे गुरुजी खुन प्रकरणाचा मुख्य सुत्रधार 
देविदास सरगर हा भोरमधील मुळे गुरूजी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहे. याबरोबरच त्याच्याविरुद्ध माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com