esakal | मराठी राजभाषा दिन : ‘कल्पक’ विचारासाठी शाळांत उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi

‘सकाळ’मधून प्रसिद्धी
पिंपळे गुरव महापालिका शाळेतील (क्र. ४५) रेणुका सूर्यवंशी हिची ‘पाऊस’ या विषयावरील कविता ‘सकाळ’च्या अंकात स्टुडंट पेज या सदराअंतर्गत प्रसिद्ध झाली. तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या लिखाणाला व्यासपीठ मिळाले, त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

मराठी राजभाषा दिन : ‘कल्पक’ विचारासाठी शाळांत उपक्रम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - विद्यार्थ्यांची कल्पकता व सर्जनशीलतेला वाव मिळावा, यासाठी महापालिकेच्या १५ प्राथमिक शाळांमध्ये हस्तलिखित उपक्रम राबविला जात आहे. त्यात स्वलिखित लेख, कविता, गोष्टी, कथा, निबंध, उखाणे, कोडी शाळांमध्ये संग्रह केला जाईल. विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा शब्दसंग्रह वाढावा, त्यांच्या क्षमता वृद्धिंगत व्हाव्यात, हा त्यामागे उद्देश आहे.

तरुणाईला मराठीपेक्षा इंग्रजी जवळची

या शैक्षणिक वर्षांपासून पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. पिंपळे गुरव मुले व कन्या, वाल्हेकरवाडी मुले, निगडी मुले व कन्या, चिंचवड स्टेशन, अजंठा नगर, इंद्रायणीनगर, चिखली मुले, चिखली कन्या, थेरगाव मुले, श्रमिक नगर या उपक्रमशील शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. नव्या शैक्षणिक वर्षांत हा उपक्रम ५० शाळांमध्ये राबविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुलांचा उत्स्फूर्त सहभाग
विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार, शास्त्रज्ञांच्या यशस्वी कथांचे आपल्या पद्धतीने आकलन करावे. अवघड गणिते सोडविण्याची गोडी लागावी, तसेच अवघड शब्दांचा मराठीतून खेळ, विविध प्रकारच्या म्हणी, निसर्गाचे वर्णन, गमतीशीर उखाणे हसत-खेळत मराठी भाषेतून शिकत आहेत. त्यामुळे मुले कंटाळा न करता हिरिरीने या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.

मायबोलीला विसरणार नाही...

लेखन, हस्तलिखित मासिके व वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे लिखाण प्रसिद्ध 
केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या याच हस्तलिखाणाचे सुंदर सजावट करून बांधणी केली आहे. जेणेकरून पुढील कित्येक वर्ष मुलांचा मराठी भाषेचा ठेवा इतरांनाही अनुभवावयास मिळावा.

मराठी राजभाषा दिन : मराठी माध्यमातून 'यूपीएससी'ला सामोरे जाताना...

हस्तलिखिताच्या माध्यमातून मुले स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिक उत्कृष्ट पद्धतीने लिखाण करण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असते.  
- साधना वाघमारे, मुख्याध्यापिका, पिंपळे गुरव शाळा

loading image